सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने प्रसाद विक्रेत्यांची दुकाने असतात, त्यातील अनेक जण अन्य धर्मीय असतात, त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते, अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबीने बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे यासाठी आता समस्त हिंदुत्ववादी संघटना ‘ओम प्रतिष्ठान’च्या माध्यमातून एकवटल्या आहेत. ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचे पावित्र्य आणि सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी ‘ॐ प्रमाणपत्र’ (OM Certification) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना नाशिकमध्ये संघटित झाल्या आहेत. शुक्रवार, १४ जूनपासून नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरापासून या चळवळीला सुरुवात होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ (OM Certification) सुरू केली आहे. या प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात जरी नाशिकमधून होणार असली तरी ती राज्यभर राबवण्याचा मानस हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आहे. यासाठी नाशिकमध्ये दररोज बैठका होत आहेत. नाशिकसारख्या पवित्र कुंभनगरीतून या चळवळीसाठी संत-महंतांचे शुभाशीर्वाद मिळत आहेत.
या संघटनांनी दिला ‘ॐ प्रमाणपत्र’ (OM Certification) ला पाठिंबा!
- पुरोहित संघ
- आखाडा परिषद
- पंचायती तपोनिधी आनंद आखाडा,
- दशनाम नागा संन्यासी
- सनातन वैदिक धर्म सभा
- श्रीपंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण
- अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज
- पंचमुखी हनुमान व रामचंद्र मंदिर ट्रस्ट
- श्रीसाई किरण धाम, रामतीर्थ
- हनुमान जन्मस्थान, अंजनेरी
- महाराष्ट्र मंदिर महासंघ
- सकल हिन्दू समाज
- मंदिर समिती, नाशिक
- स्वामी समर्थ केंद्र, त्र्यंबकेश्वर
Join Our WhatsApp Community