Hindu Population 2050 : २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू पोचणार तिसर्‍या क्रमांकावर

90
Hindu Population 2050 : २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू पोचणार तिसर्‍या क्रमांकावर
Hindu Population 2050 : २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येत हिंदू पोचणार तिसर्‍या क्रमांकावर

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या (Pew Research Center) अभ्यासानुसार वर्ष २०५० पर्यंत हिंदू जगातील तिसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या बनतील. तोपर्यंत भारतातील हिंदु लोकसंख्या १३० कोटी होईल. भारतात प्रत्येक ४ लोकांपैकी ३ लोक हिंदू असतील. वर्ष २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येमध्ये हिंदूंचा एकूण वाटा १४.९ टक्के असेल. यानंतर १३.२ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेले लोक असतील. त्या कालावधीपर्यंत संपूर्ण जगात हिंदूंची लोकसंख्या ३४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या अहवालात सध्या तिसर्‍या क्रमांकावर कोणत्या विचारसरणीचे अथवा पंथाचे लोक आहेत, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. (Hindu Population 2050)

(हेही वाचा – Dr. Manmohan Singh यांच्यावर निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार)

भारतात जगातील सर्वाधिक मुसलमान ?

मुसलमानांमधील उच्च प्रजनन प्रमाण, तसेच सर्वांत तरुणवर्ग असल्यामुळे या कालावधीत भारत (India) इंडोनेशियाला (Indonesia) मागे टाकून सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश बनेल. भारतातील मुसलमानांची लोकसंख्या ३१.१ कोटी असेल, जी संपूर्ण जगातील मुसलमानांच्या ११ टक्के असेल. याचा अर्थ भारत हा इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि नायजेरिया या मुसलमानांची मोठी लोकसंख्या असलेल्या इस्लामी देशांना मागे टाकेल. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार इस्लाम जगातील सर्वांत वेगाने वाढणारा धार्मिक गट आहे. वर्ष २०१० पर्यंत जगात १६० कोटी मुसलमान होते. वर्ष २०५० पर्यंत ही लोकसंख्या २८० कोटी होईल.

भारतातील ख्रिस्त्यांची लोकसंख्या सध्या एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के आहे. वर्ष २०५० पर्यंत ती २.३ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. (Hindu Population 2050)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.