Gujarat मधील पाक सीमेजवळील गावात हिंदूंची लोकसंख्या घटली; अहवालानुसार, जमिनींवर मुस्लिमानांचा कब्जा

76
Gujarat मधील पाक सीमेजवळील गावात हिंदूंची लोकसंख्या घटली; अहवालानुसार, जमिनींवर मुस्लिमानांचा कब्जा
Gujarat मधील पाक सीमेजवळील गावात हिंदूंची लोकसंख्या घटली; अहवालानुसार, जमिनींवर मुस्लिमानांचा कब्जा

पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेवरील गुजरातमधील (Gujarat) गावांची लोकसंख्या झपाट्याने बदलत आहे. कच्छच्या रणातील गावातील हिंदूंची (Hindu) लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या गावांमध्ये मुस्लिम (Muslim) कुटुंबांची लोकसंख्या वाढत असून अनेक गावात एकही हिंदू कुटुंब राहत नाही. अनेक गावांमधून हिंदू (Hindu) स्थलांतरित होत आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

( हेही वाचा : Ranji Trophy : रोहित, यशस्वी व श्रेयस मुंबईच्या शेवटच्या साखळी सामन्याला मुकणार

दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील (Gujarat) कच्छ जिल्ह्यातील पाकिस्तान (Pakistan) सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेली सहा गावात एकही हिंदू नाही. या गावांमधील मतदार यादीतूनही ही वस्तुस्थिती समोर आली आहे. अशी १७ गावे आहेत, जिथे हिंदू (Hindu) लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तरी हा अहवाल तयार करण्यासाठी २३ गावांचा अभ्यास करण्यात आला.

अहवालानुसार, कच्छमधील (Kachchh) मोटा दिनारा गावात आता फक्त एकच हिंदू कुटुंब राहते. पूर्वी येथे ३० हिंदू कुटुंबे राहत होती पण हळूहळू ती सर्व स्थलांतरित झाली आहेत. ही सर्व कुटुंबे ५०० वर्षे जुन्या मंदिराजवळ राहत होती. ही कुटुंबे येथून जवळच्या गावांमध्ये स्थलांतरित झाली आहेत जिथे मूलभूत सुविधा चांगल्या आहेत. मंदिरात मोठा कार्यक्रम असला की, ही कुटुंबे तात्पुरते पुन्हा आधीच्या ठिकाणी येतात. २००१ मध्ये झालेल्या भूकंपानंतर यातील बरेच हिंदू विस्थापित झाले. या गावापासून दूर त्याच्यासाठी एक घर बांधण्यात आले. या भूकंपानंतर अनेक लोकांनी आपली घरे दुरूस्त केली नाहीत.

येथील शेह गावात फक्त ८ हिंदू मतदार आहेत. तर येथे १५२ मुस्लिम मतदार आहेत. चांगली रुग्णालये आणि शाळा सुविधा येथून खूप दूर आहेत, त्यामुळे कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. भुजमध्ये एक चांगले रुग्णालय देखील आहे. पण ते भुज येथून १५० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांना स्थलांतर करावे लागते.

अहवालात असे दिसून आले आहे की सुथारी गावात काही वर्षांपूर्वी हिंदूंची लोकसंख्या २५०० होती, ती आता कमी होऊन १००० च्या आसपास झाली आहे. हिंदूंनी गाव सोडले आहे, तर काही मुस्लिम बाहेरून येऊन तिथे स्थायिक होऊ लागले आहेत. लखपत आणि कानेरसारख्या गावांतील लोक कामासाठी सुरत आणि मुंबईला जाऊ लागले आहेत. येथील हिंदू संघटना स्थलांतराचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत.

या भागात अंमली पदार्थांची तस्करी आणि देशविरोधी कारवाया होत असल्याचा आरोप हिंदू संघटना करत आहेत. काही लोकांचा असा आरोप आहे की, मुस्लिम लोकांनी गावातील सर्व जमिनींवर कब्जा केला आहे, ज्यामध्ये सरकारी जमीनही समाविष्ट आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींना एक पत्रही लिहिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि या ठिकाणाची लोकसंख्या लक्षात घेता स्थलांतर थांबवावे अशी हिंदू संघटनांची मागणी आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.