उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पिलीभीत येथील एका हिंदू (Hindu) व्यक्तीला बांगलादेशातून (Bangladesh) येथून आल्यावर ५३ वर्षांनी भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारामुळे ते आपल्या कुटुंबासह भारतात आले. १९७१ ते २०२४ पर्यंत त्यांना निर्वासित म्हणून जीवन व्यथित करावे लागले. दरम्यान नागरिकत्वासाठी त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केले पण त्यांना नागरिकत्व मिळवण्यात यश आले नाही. मात्र मोदी सरकारने आणलेल्या CAA कायद्यामुळे त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.
( हेही वाचा : मुंबई हल्ल्याचा आरोपी Abdul Rehman Makki याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)
५३ वर्ष घुसखोर म्हणून असणारी ओळख मिटली
एका अहवालानुसार, पीलीभीत (Pilibhit) जिल्ह्यात न्यूरिया हुसैनपूर गावात राहणारे निरंजन मंडल यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. ते ७४ वर्षाचे आहेत. निरंजन मंडल १९७१ मध्ये बांगलादेश (Bangladesh) (पूर्व पाकिस्तान) मधील फरीदपुर मंडल येथे राहत होते. मात्र १९७१ रोजी जेव्हा पाकिस्तानी सैन्याने हिंदू (Hindu) आणि बंगाली भाषिकांवर अत्याचार सुरु केला तेव्हा त्यांना देश सोडून विस्थापित व्हावे लागले. त्यावेळी ते आपल्या आईसह २१ वर्ष वय असताना तेथून पळाले. त्यावेळी ते बांगलादेशातून भारतात आले.
निरंजन मंडल यांनी सांगितले की, पाक लष्कराच्या अत्याचारामुळे तो १० दिवस आईसोबत लपून कसे तरी भारतीय सीमेवर पोहचले. येथून ते कोलकाता येथे निर्वासितांच्या छावणीत २० दिवस राहिले. इथून ते कसे तरी नेपाळमार्गे पीलीभीतला (Pilibhit) पोहचले. यानंतर ते न्यूरिया हुसैनपूर येथे स्थायिक झाले. पिलीभीतमध्ये (Pilibhit) बंगाली समाज मोठ्या संख्येने राहतो. मात्र, भारतात आल्यानंतर त्यांचे आयुष्यात अनेक संकटे आली. त्यांना भाषेच्या अडचणी आणि रोजगाराच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
निरंजन मंडल (Niranjan Mandal) भारतात आले आणि इथे निर्वासित म्हणून राहू लागले. त्यावेळी त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकले नाही. कायदेशीर अडथळ्यांमुळे त्यांना ५३ वर्ष घुसखोर म्हणून ओळखले जात होते. मात्र आता २०२४ ला CAA कायदा लागू झाला त्यानंतर पुन्हा नागरिकत्वासाठी त्यांनी अर्ज केला. त्यानंतर डिसेंबर २०२४ रोजी त्यांना नागरिकत्व मिळू शकले.
पीलीभीतमधून ७५०० लोकांचे नागरिकत्वासाठी निवेदन
CAA लागू झाल्यानंतर पिलीभीत (Pilibhit) जिल्ह्यातून नागरिकत्वासाठी ७९९० अर्ज आले आहेत. त्यापैकी ९ जणांना नागरिकत्वही मिळाले आहे. अपूर्ण कागदपत्रे किंवा पडताळणीतील अडचणींमुळे हजारो अर्जही रद्द करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिलीभीतमधून मोठ्या संख्येने अर्ज येण्याचे कारण म्हणजे नेपाळला लागून असलेली खुली सीमा. येथून वेगवेगळ्या वेळी मोठ्या संख्येने निर्वासित आले आहेत .
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community