अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या Vishnu Gupta यांच्यावर गोळीबार

253
अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या Vishnu Gupta यांच्यावर गोळीबार
अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या Vishnu Gupta यांच्यावर गोळीबार

हिंदू सेना (Hindu Sena) या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) यांच्यावर दि. २५ जानेवारी रोजी सकाळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेर (Ajmer) शहारात ही घटना घडली. या हल्ल्यात गुप्ता थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने गुप्ता यांना एकही गोळी लागली नाही. गुप्ता अजमेरवरून दिल्लीला (Delhi) जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. अजमेरमधील गेगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वंदिता राणा आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : colaba causeway market का आहे प्रसिद्ध? काय आहे वैशिष्ट्य?

अलीकडेच विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) यांनी अजमेर दर्गा हा शिवमंदिर (Shiva Temple) पाडून बांधण्यात आल्याचा दावा केला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायलयात याचिका दाखल केली होती. अजमेर जिल्हा सत्र न्यायालयात दि. २४ जानेवारी रोजी सुनावणी झाली. तसेच त्यांनी त्यांच्या सुरक्षेसंबंधीची याचिका देखील दाखल केली आहे. गुप्ता यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशातच त्यांच्यावर आज गोळीबार झाला आहे.

याप्रकरणी विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) म्हणाले की, न्यायालयात सुनावणी चालू असताना आजूबाजूच्या परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे अवघड होऊन जाते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिक बंदोबस्त करावा लागेल. मी यासंदर्भात पोलिसांना विनंती केली असून न्यायालयाच्या बाहेर शांतता राखावी. न्यायालय परिसरात शांततापूर्ण वातावरण राहावं, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासन विशेष बंदोबस्त करेल अशी अपेक्षा आहे. हे धार्मिक भावनांशी संबंधित प्रकरण असल्याने स्थिती संवेदनशील बनली आहे. आमच्या याचिकेवरील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, असे ही गुप्ता (Vishnu Gupta) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.