हिंदू असणे म्हणजे उदार असणे, प्रत्येकाला सद्भावना दाखवणे, मग त्याची श्रद्धा, जात, आहार पद्धत काहीही असो. हिंदू समाज हा देशाचा कर्ता आहे. त्यामुळे या देशात काहीही घडले तरी त्याचा परिणाम हिंदू समाजावर होतो आणि चांगले घडले तर हिंदूचा अभिमान वाढतो, कारण हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे, असे उद्गार सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काढले. ते रविवारी राजस्थान येथील अलवर या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
(हेही वाचा – आली निवडणूक घ्या बाप्पांचे दर्शन… स्वताला निधर्मवादी म्हणवणारे Pawar family बाप्पांच्या दर्शनात लीन. )
मोहन भागवत पुढे म्हणाले की, हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वांत उदार व्यक्ती असणे, जी व्यक्ती सर्वांना सामावून घेते, सर्वांसमोर सद्भावना दाखवते. आपण ज्याला हिंदु धर्म म्हणतो, तोच मुळात एक वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे असते. हिंदूंना त्यांच्या महान पूर्वजांकडून या मूल्यांचा वारसा मिळालेला आहे. हिंदू शिक्षणाचा वापर कोणालाही कमी दाखवण्यासाठी नव्हे, तर ज्ञान वाटण्यासाठी करतात. संपत्तीचा वापर स्वतःसाठी न करता परोपकारासाठी करतो. शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतो.
मोहन भागवत म्हणाले, हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणाऱ्याला हिंदू मानले जाते. तो कोणाची पूजा करतो, कुठली भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश किंवा आहाराच्या सवयी काय, याचा काहीही फरक पडत नाही. एक काळ होता जेव्हा संघाला फारसे कोणी ओळखत नव्हते. पण त्याला आता व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत; पण मनातून तेच लोक याचा आदर बाळगतात. राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्य, आत्म जागरूकता आणि नागरी अनुशासन या पाच मूलभूत तत्वांचा अवलंब आणि प्रचार करावा.
महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण
सध्या महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर जबाबदार आहे. यामुळे पिढीची पारंपरिक मूल्यांशी झपाट्याने स्पर्श होत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि भोजनासाठी एकत्र यावे. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील, तसेच सांस्कृतिक मूल्यांचेही रक्षण होईल, असे मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community