Free Hindu Temples : हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणातून मुक्तता व्हावी; विश्व हिंदू परिषदेची मागणी

Free Hindu Temples : दक्षिण भारतातील पाच राज्यांमधील अनेक हिंदू मंदिरांवर आज सरकारचे नियंत्रण आहे. या मंदिरांसह देशभरातील सर्वच मंदिरे ही सरकारी नियंत्रणातून मुक्त असावीत, यासाठी कायदा व्हावा.

287
Free Hindu Temples : हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणातून मुक्तता व्हावी; विश्व हिंदू परिषदेची मागणी
Free Hindu Temples : हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणातून मुक्तता व्हावी; विश्व हिंदू परिषदेची मागणी

हिंदूंची मंदिरे ही सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावीत, यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्नशील आहे, अशी माहिती विहिंपचे केन्द्रिय महामंत्री मिलिंद परांडे (Milind Parande) यांनी दिली. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्म परिवर्तन (conversion) यांवर विहिंप लक्ष केंद्रित करणार आहे, असेही ते म्हणाले. (Free Hindu Temples) मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी पत्रकार परिषदेत यावर विस्तृत माहिती दिली. या वेळी विहिंपचे (VHP) कोकण प्रांत सहमंत्री श्रीराज नायर व प्रचार प्रमुख नरेंद्र मुजुमदार उपस्थित होते.

(हेही वाचा – Deepak Kesarkar : मंत्रीपदासाठी १ कोटीचा चेक उद्धव ठाकरेंकडे दिला; काय म्हणाले दीपक केसरकर)

सरकारने मंदिरे हिंदू समाजाकडे सोपवावी

मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, दक्षिण भारतातील पाच राज्यांमधील अनेक हिंदू मंदिरांवर आज सरकारचे नियंत्रण आहे. या मंदिरांसह देशभरातील सर्वच मंदिरे ही सरकारी नियंत्रणातून मुक्त असावीत, यासाठी कायदा व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्नशील आहे. याबाबत तज्ज्ञांशी विचारमंथन केले जात आहे. सरकारने हिंदू मंदिरे (Hindu Temples) हिंदू समाजाकडे सोपवावीत. विहिंप सर्व मंदिरांवर सर्व समाजाचा सहभाग घेऊन विश्वस्त नियुक्त करेल.

दानपेटीतील धनाचा उपयोग धर्माच्या प्रचारासाठी व्हावा

दानपेटीतील धनाचा उपयोग हा धर्माचा प्रचार करण्यासाठी व्हावा, तसेच धर्म आणि समाजाच्या सेवेकरिता व्हावा. मंदिर संचालनामध्ये ज्या अडचणी येतात, त्यातून मार्ग काढण्यासाठी एक व्यवस्थादेखील तयार करण्यात यावी, अशी विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. त्यासाठी अनेक साधूसंत, निवृत्त मुख्य न्यायाधीश, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे वकील त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकर्ते यांचा एक विचार समूह तयार करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Road Safety : रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून आयुष्य सुरक्षित ठेवावे, परिवहन आयुक्तांचे आवाहन)

लव्ह जिहाद आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून केले जाणारे हिंदूंचे धर्मपरिवर्तन याकडेही संघटनेचे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठीही विहिंप प्रयत्नशील असल्याचे मिलिंद परांडे यांनी सांगितले. (Free Hindu Temples)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.