आक्रमक मुसलमानांना शांत करण्यासाठी हिंदु युवकाला मृत घोषित करावे लागले; Bangladesh पोलिसांचे स्पष्टीकरण

४ सप्टेंबर रोजी सामाजिक माध्यमांवर महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याच्या कथित आरोपावरून ३ हजार ते ५ हजार जणांच्या हिंसक मुसलमान जमावाने हिंदु युवकाला पोलीस ठाण्यातच मारहाण केली होती.

169
बांगलादेशातील (Bangladesh) खुलना येथे ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण केलेला हिंदू युवक उत्सव मंडल जिवंत आहे, असे बांगलादेशच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने (आय.एस.पी.आर.) घोषित केले आहे. संचालनालयाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्सव मंडलवर लष्कराच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आता त्याची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे.
४ सप्टेंबर रोजी सामाजिक माध्यमांवर महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याच्या कथित आरोपावरून ३ हजार ते ५ हजार जणांच्या हिंसक मुसलमान जमावाने हिंदु युवकाला पोलीस ठाण्यातच मारहाण केली होती. या मारहाणीत उत्सव मंडल याचा मृत्यू झाला, असे बांगलादेश (Bangladesh) पोलिसांनी घोषित केले होते. यानंतर ६ सप्टेंबर रोजी बांगलादेशच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रक्तपिपासू मुसलमान जमावाला पांगवण्यासाठी जवळच्या मशिदींच्या लाऊडस्पीकरवरून हिंदु तरुणाचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली, त्यानंतर जमाव माघार घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे. सशस्त्र दलांच्या प्रयत्नांमुळे मंडलला जिवंत वाचवण्यात आले आणि नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. उत्सव मंडलला रुग्णालयातून सोडल्यानंतर त्याच्यावर ईशनिंदेच्या प्रकरणात संबंधित अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात येईल. मुसलमान जमावाने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा संदर्भ देत निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशी (Bangladesh) सैन्य नेहमीच बेकायदेशीर हत्या रोखण्यासाठी आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.