हिंदू युवकाला धर्मांध मुसलमानांकडून मारहाण, कायदा हातात घेणे घटनाबाह्यवर्तन!

196

आपल्या देशात हिंदूंवर जर अन्याय झाला तर तो हिंदूंनी शांतपणे सहन करावा. त्यांच्या श्रद्धास्थानांवर जर कोणी आघात केले तर हिंदूंनी शांतपणे तो आघात सहन करावा.  त्या विरोधात जर हिंदूंनी सनदशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन केले तर देशाच्या घटनेचे उल्लंघन होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते. कारण हिंदू सहिष्णू आहेत. ती सहिष्णुता त्यांनी त्यांच्यावर कितीही अत्याचार झाले तरी पाळलीच पाहिजे. अन्यथा हिंदू हिंसक आहेत. हिंदू अतिरेकी आहेत. हिंदूंनी देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असा गळा काढायला सर्वांना मोकळे रान आहे.

सहिष्णुता पाळण्याचा मक्ता केवळ हिंदूंचा

वास्तविक कोणीही कोणाच्याही श्रद्धास्थानांवर आघात करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.‌ ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे.‌ हे आम्ही इथे आरंभीच स्पष्ट करत आहोत. मुसलमानांनी जर काही अन्याय, अत्याचार, इतरांच्या श्रद्धास्थानांवर आघात केले किंवा हिंदुत्ववादी नसलेल्यांनी काही अन्याय, अत्याचार इतरांच्या श्रद्धास्थानांवर आघात केले तर लोकशाही धोक्यात येत नाही. कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर, भाषण स्वातंत्र्यावर, विचार स्वातंत्र्यावर गदा येत नाही. कारण हिंदू सहिष्णू आहेत. सहिष्णुता पाळण्याचा मक्ता केवळ हिंदूंचा आहे अन्य कोणाचा नाही. असा एक अलिखित नियम निर्माण झाला आहे.

हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये

हैदराबादमध्ये घडलेली घटना चिंताजनक आहे. तिथल्या एका खाजगी विद्यापीठात शिकणाऱ्या हिमांक बन्सल नावाच्या विद्यार्थ्याला वीस धर्मांध मुसलमान तरुणांनी बेदम चोप दिला. त्याचे कारण काय तर त्याने आपल्या मैत्रिणीशी फोनवरती बोलताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला. म्हणून त्याला या तरुणांनी बेदम मारले. हिंदू देवदेवतांविषयी ज्यावेळी मुसलमान समाजातील नेतेमंडळी वाटेल ते बोलतात त्यावेळी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर केलेला तो आघात नसतो. त्यांना मिळालेला तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटना दत्त अधिकार असतो. म्हणून हिंदूंनी गप्प बसले पाहिजे. हाच न्याय असेल तर तो केवळ मुसलमानांना मिळता कामा नये‌. तो हिंदूंनाही मिळाला पाहिजे. मुसलमान हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करतात त्यावेळी तो आघात मुसलमानांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सहन करण्याचे बंधन हिंदूंना बंधनकारक असेल तर त्याच न्यायाने हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावताना मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यांनीही गप्प बसावे. पण असे घडत नाही.

(हेही वाचा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांना नाहक त्रास)

मुसलमानांना हिंदूंच्या भावनांचा अनादर

मुसलमानांच्या श्रद्धास्थानांवर आघात केल्याची शिक्षा म्हणून ‘सर तन से जुदा’ हा न्याय ठरतो. त्यावेळी कायदा हातात घेतला म्हणून कोणीही गळा काढत नाही. त्या विरोधात कोणीही बोलत नाही. आताही तेच झाले. हिमांक बन्सल याने जे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी जे विधान केले तेच विधान झाकीर नाईक या इस्लामी विद्वानाने केले होते. हदीसमध्ये तसा दाखलाही आढळतो. झाकिर नाईक मात्र त्यासाठी अपराधी ठरत नाहीत. एखादी गोष्ट आपल्या भावनांना धक्का पोहोचवत असेल तर त्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार करता येते. आपल्याला न्याय मिळवण्याचे सनदशीर मार्ग या देशात उपलब्ध आहेत. त्या मार्गाचा अवलंब न करता कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करणे याचा अर्थ समाजातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणे असा होतो. आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी दाद मागण्याचा हक्क घटनेने दिला आहे. त्यासाठी आपल्याला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. न्यायव्यवस्था अस्तित्वात असताना अशा प्रकारे परस्पर न्याय देऊन एखाद्याला शिक्षा करणे हा दखलपात्र अपराध आहे. पण असा धाक राहिला नाही. दुर्दैवाने ही गोष्ट सत्य आहे.

सुसंस्कृतपणे वर्तन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य

मुसलमानांकडून अशा प्रकारचे वर्तन वारंवार घडते आहे. स्वतःची स्वतंत्र न्यायव्यवस्था जणू त्यांनी निर्माण केली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.‌ आपल्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला आपणच आपल्या मनाप्रमाणे शिक्षा करण्याचा अधिकार कोणाही नागरिकाला घटनेने दिला नाही. पण ही गोष्ट मुसलमान समाज लक्षात घेत नाही. पोलिसांवरही दगडफेक करणारा मुसलमान समाजाच आहे. सैनिकांवरही दगडफेक करणारे मुसलमानच होते.‌ देशातल्या निर्बंधांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादेत राहून सुसंस्कृतपणे वर्तन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मुसलमान समाज मात्र असे सुसंस्कृत वर्तन करताना आढळत नाही.‌ या समाजाला सर्व प्रकारच्या सोयी, सुविधा हव्या आहेत. सवलती हव्या आहेत. पण या देशातल्या निर्बंधांच्या चौकटीत राहण्यास मात्र ते राजी नाहीत. असा अनुभव वारंवार येत आहे. राष्ट्राच्या सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.‌ सरकारने वेळीच अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि सर्वसामान्य जनतेला सुखाने जगण्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण करावे.‌ अशी मागणी नागरिक करत असतील तर सरकारने सुद्धा त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करू नये एवढीच अपेक्षा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.