Mira Road मध्ये फटाके फोडणाऱ्या हिंदू तरुणावर धर्मांधांचा हल्ला

115

दिवाळीच्या शुभदिनी अनेक जण फटाक्यांची आतषबाजी करत असतात. मीरारोडमध्ये (Mira Road) फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादावेळी कट्टरपंथींनी धारदार शस्त्रांनी हिंदूवर हल्ला केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

( हेही वाचा :  Maharashtra Assembly Election 2024 : उबाठाचे गटप्रमुख ५ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर, ‘या’ भागातून करणार सुरुवात ) 

मीरारोडमधील (Mira Road) वादाचा व्हिडिओ दि. २७ ऑक्टोबर रोजी एक्स प्लॅटफॉर्मवरून व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडिओत घराबाहेर फटाके फोडणाऱ्या हिंदूवर कट्टरपंथींनी हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी धारदार शस्त्रांसह १० ते १२ कट्टरपंथी हल्लेखोरांनी हिंदूंना लक्ष्य केले. या हल्ल्यात तीन हिंदू जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Mira Road)

व्हायरल व्हिडिओत पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, फटाके फोडणाऱ्या हिंदू तरुणाला कट्टरपंथी शिवीगाळ करत फटाके का फोडत आहे, अशी विचारणा करतात. त्यानंतर फटाके फोडणाऱ्या तरुणींवर दहा जणांवर चाकूने हल्ला केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. (Mira Road)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.