सनातन धर्म संपवण्यासाठी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार; Saint Ratan Gosai यांचे विधान

23
सनातन धर्म संपवण्यासाठी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार; Saint Ratan Gosai यांचे विधान
सनातन धर्म संपवण्यासाठी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार; Saint Ratan Gosai यांचे विधान

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथून महाकुंभमेळ्याला आलेले संत रतन गोसाई (Saint Ratan Gosai ) म्हणाले की, बांगलादेशमध्ये सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी हिंदूंवर (Hindu) अत्याचार केले जात आहेत. तिथे आयाबहिणींच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहेत. सनातनी हिंदू भीतीपोटी मुस्लिम धर्मात धर्मांतर करत आहेत. त्यातच भारत सरकारने तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी गोसाई (Saint Ratan Gosai ) यांनी केली.

( हेही वाचा : Republic Day : भारतपर्व महोत्सवात असणार महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ

संत रतन गोस्वामी (Saint Ratan Gosai ) यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, सामाजिक समरसतेतून भारत महान होऊ शकत नाही. आपल्या संतांनी आणि महापुरुषांनी कधीही भेदभावाला मान्यता दिली नाही. देव प्रत्येकात असतो. जातीभेदाला आपण थार देऊ नये. देवीदेवतांची प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही. महाकुंभाबद्दल संत रतन गोसाई म्हणाले की, महाकुंभमध्ये संतांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे आभार मानतो. त्यांनी आम्हा संतांची मने जिंकली आहेत. (Saint Ratan Gosai ) (Hindu)

दरम्यान तेलंगणाहून आलेले संग्राम महाराज (Sangram Maharaj) म्हणाले की, अनुसूचित जाती समाजातील ८० टक्के लोक मुस्लिम झाले आहेत. कारण संत त्यांच्यापर्यंत पोहचले नाहीत. अनेक ठिकाणी साधूसंत अस्पृश्य जातीतील भक्तांना भेट देत नाहीत. देव प्रत्येकात असतो म्हणून कोणताही भेदभाव नसावा. आज गरिबांसाठी कोणताही आखाडा नाही. मी बंजारा समाजाचा आहे. बंजारा समाज भटका नाही. मी माझे आचरण, विचार आणि मूल्ये जपली आहेत.(Saint Ratan Gosai )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.