अहमदाबादमधील खोखरा परिसरात दि. २३ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) भारताने पाकिस्तानविरोधातील सामन्यात विजय मिळवल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला जात होता. त्याचवेळी हिंदूंवर (Hindu) मुस्लिम तरुणांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद शतकामुळे भारताने पाकिस्तानला (Pakistan) ६ विकेट्सनी हरवल्यानंतर, अहमदाबादच्या खोखरा भागात असलेल्या अनुपम सिनेमाजवळ हिंदू (Hindu) लोक फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आनंद साजरा करत होते. त्यावेळी १५- २० मुस्लिम जमावाने दगडफेक करायला सुरुवात केली.
( हेही वाचा : साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात; CM Devendra Fadnavis यांचा सल्ला)
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोन मुस्लिम (Muslim) दुचाकीस्वारांसोबत फटाके फोडण्यावरून वाद झाला. त्यानंतर ते निघून गेले आणि जमावाला घेऊन येत त्यांनी दगडफेक केली. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, या हल्ल्यात ६-७ हिंदू (Hindu) लोक जखमी झाले आहेत. त्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दगडफेक केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आणि तपास सुरू केला. मात्र अद्याप कोणालीही अटक करण्यात आलेले नाही, तसेच कोणावरही एफआयआर दाखल झालेला नाही. जखमींवर उपचार सुरू आहेत.(Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community