हिंदूंचे धर्मांतर (Hindus Conversion) केल्याच्या प्रकरणी दोषी असलेल्या एका ख्रिस्ती जोडप्याला आंबेडकर नगर जिल्ह्यातील विशेष अनुसूचित जाती-जमाती न्यायालयाचे न्यायाधीश रामविलास सिंह यांनी प्रत्येकी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत आरोपींना शिक्षा करण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे.
(हेही वाचा Republic Day 2025 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये जेष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे हस्ते ध्वजारोहण)
२३ जानेवारी २०२३ या दिवशी जलालपूरमधील जमौली येथील रहिवासी भाजप नेते चंद्रिका प्रसाद यांनी मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया बँक कॉलनी येथील रहिवासी जोस पापचन आणि त्यांची पत्नी शीजा ए.एम्.एन्. यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. चंद्रिका प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, जोस आणि शीजा हे शाहपूर फिरोज गावातील दलित वस्तीत ३ महिन्यांपासून सक्रीय होते. दोघेही गरीब कुटुंबांकडे जाऊन त्यांना फसवत असत. २५ डिसेंबर २०२२ या दिवशी दलित वस्तीत मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करून धर्मांतर (Hindus Conversion) करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रिका प्रसाद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. त्याच्याकडून ख्रिस्ती धर्माशी संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community