मुंबईसह देशभरात सुरू असलेल्या लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे लागू करावेत या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आयोजित ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त घाटकोपर येथे हजारो हिंदू रस्त्यावर उतरणार आहेत. रविवार, 22 जानेवारी या दिवशी दुपारी 4.30 वाजता सर्वोदय हॉस्पिटल चौक, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.) येथून हा ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार असून या मोर्च्याचे रूपांतर शेवटी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, विक्रोळी येथे सभेत होईल. या मोर्च्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी दिली.
11 राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा
डॉ. धुरी पुढे म्हणाले, ‘पालघर जिल्ह्यातील वसई येथील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची लव्ह-जिहादी आफताबने तिचे 35 तुकडे करुन निघृण हत्या केली. मुंबईतील टिळकनगर येथील रुपाली चंदनशिवे, धारावी येथील यथोधरा खटिक, कोरपखैरणे येथील उर्वशी वैष्णव, मुंबईतील अभिनेत्री तनुषी शर्मा यांसारख्या अनेक तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या असून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडल्या आहेत. जनतेमध्येही ‘लव्ह जिहाद’ विषयी रोष आता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात आज 20 हजार 630 मुली आणि महिला गायब असण्याची धक्कादायक स्थिती आहे. देशातील 11 राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची आम्ही मागणी करत आहोत.’
(हेही वाचा ट्विटरचे ब्ल्यू-टिक पाहिजे, तर 11 डॉलर्स मोजा)
शेकडो हिंदु परिवारांचे गेल्या 10 वर्षांत पलायन
मालाड येथील मालवणी भागात अनाधिकृत मशिदी उभारण्यासह धर्मांधांचा दबाव, छळ, मारहाण, युवतींची छेडछाड यामुळे तेथील शेकडो हिंदु परिवारांनी गेल्या 10 वर्षांत पलायन केले आहे. देशात अनेक ठिकाणी हिंदूंना जबरदस्तीने पलायन करण्यास भाग पाडले जात आहे, तसेच ‘वक्फ बोर्ड’सुद्धा सरकारी व खाजगी जमीन हडप करत आहे. हा काळा कायदा सुद्धा रद्द करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर अनाधिकृत बांधकामे झाली असून ही बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त केले पाहिजे. देशात छळ, बळ, कपट यांद्वारे हिंदूंचे वाढते धर्मांतर रोखले जावे यासाठी धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी आम्ही या मोर्च्यामध्ये करणार आहोत’, असेही डॉ. उदय धुरी शेवटी म्हणाले. तर लॅण्ड जिहाद प्रकरणात लढ़ा देणारे घाटकोपर येथील रहिवाशी रवींद्र नलावड़े म्हणाले की, ‘असल्फा व्हिलेज, घाटकोपर (प) मधील भारत सोसायटी रहिवाशी संघ येथे अनधिकृत मदरशा बांधण्यात आला आहे. आम्ही स्थानिक नागरिकांनी या विरोधात मागील आठवड्यात भव्य मोर्चा काढला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम तोडावे, अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community