नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाले. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हिंदुस्थान पोस्ट मुंबईतील शासकीय इस्पितळांची रियालिटी टेस्ट करण्यासाठी जे जे इस्पितळात गेले असता त्या ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली. (J J Hospital)
हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा…
जे जे हॉस्पिटलमध्ये मंगळवार, ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी दुर्गा जयस्वाल ह्या आपली आई कमलादेवीला घेऊन आले होते. डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्यासाठी गेले असता दिलेल्या चार औषधांपैकी एकच औषध त्यांना मिळाले आणि बाकीची औषधे बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर काही रक्त तपासण्या देखील करण्यासाठी सांगितले होते, त्यानुसार दुर्गा जयस्वाल आपली आई कमलादेवीला घेऊन ओपीडी बिल्डिंगच्या सात नंबर मध्ये गेले असता त्यातील बऱ्याचशा रक्त तपासण्या येथे होतच नाहीत त्या आपण बाहेरून कराव्यात असा सल्ला देण्यात आला. (J J Hospital)
(हेही वाचा – Asian Games 2023 : तिरंदाजीतही भारताला सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता)
ही फक्त एक केस स्टडी म्हणून आम्ही आपणास सांगत आहोत अशा बऱ्याच रुग्णांसोबत अशाच प्रकारच्या घटना रोज होत असतात. राज्यभरातील गोरगरीब रुग्ण या ठिकाणी आपल्या वरती योग्य इलाज करण्याच्या अपेक्षेने शासकीय रुग्णालयात येतात. खिशात पैशांची कमी असते आणि त्यातच इस्पितळात न साधी साधी औषधे उदाहरणार्थ पॅरासिटॅमॉल, क्रोसिन सारखी औषधे देखील इस्पितळाच्या बाहेर असलेल्या औषधांच्या दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला येथे दिला जातो. रक्त तपासण्या देखील बऱ्याचशा या ठिकाणी होत नाहीत. यावरून हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा तर दिसून येतो, परंतु रक्त तपासण्या देखील पुरेशा होत नाहीत आणि त्यामुळे रुग्णांच्या खिशाला अधिकचा भार उचलावा लागत आहे. (J J Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community