दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलाखाली जागेत स्ट्रीट लाईटमधून होणारी चोरी अखेर बेस्ट उपक्रमाने पकडली असून दोन दिवसांपूर्वी येथील सर्व अनधिकृत वीज जोडण्या तोडून सर्व वायर आणि बल्ब बेस्टने जप्त केले आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दादरमधील या खुलेआम वीज चोरीचे वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर बेस्टने महापालिकेच्या मदतीने ही कारवाई बुधवारपासून पार पाडली. त्यामुळे केशवसुत उड्डाणपूलाखालील आणि आसपासच्या फेरीवाल्यांकडून खुलेआम होणारा विजेचा वापर रोखण्यात यश आल्याने येथील प्रत्येक गाळ्यांमध्ये आता अंधार पसरला आहे. (Hindustan Post Impact)
दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाईटमधून अनधिकृतपणे विजेच्या जोडण्या घेऊन बिनधास्तपणे फेरीवाले मागील अनेक वर्षांपासून बेस्टच्या विजेचा वापर करत आहे. या स्ट्रीट लाईटसाठी महापालिकेच्यावतीने विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला पैसे अदा केले जाते. परंतु या स्ट्रीट लाईटमधून विजेची चोरी होत असताना बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक फेरीवाल्यांकडून अधिक वॅटच्या प्रकाशदिव्यांचा वापर केला जातो, तसेच हॅलोजन आणि पंख्यांचाही वापर केला जात असल्याची बाब ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दादरमध्ये खुलेआम वीज चोरी या आशयाचे वृत्त प्रकाशित करत बेस्टसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या अनधिकृत वीज चोरीमुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत असून हे नुकसान सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या खिशातून बेस्ट वसूल करत असल्याने चोरीमुळे गळतीच्या स्वरुपात होणारे हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीकोनातून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने या प्रकरणावर प्रकाशझोत टाकला होता. (Hindustan Post Impact)
(हेही वाचा – Electricity Theft : दादरमध्ये खुलेआम वीज चोरी, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलाय का फेरीवाल्यांना मोफत वीज वापराचा परवाना?)
दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलाखाली जागेत स्ट्रीट लाईटमधून होणारी चोरी अखेर बेस्ट उपक्रमाने पकडली. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने या खुलेआम वीज चोरीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सर्व अनधिकृत वीज जोडण्या तोडून सर्व वायर आणि बल्ब बेस्टने जप्त केले.
.https://t.co/jS6i5iTBkV pic.twitter.com/qtIXypmM46— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 22, 2024
हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी बेस्ट उपक्रमाचे मोठे पथक दादर केशवसुत उड्डाणपुलाखाली धडकले आणि त्यांनी येथील प्रत्येक गाळ्यांमध्ये होणारी वीज चोरीच्या जोडण्या तोडून त्याच्या वायर ताब्यात घेतल्या. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी यावेळी वायरसह वीजेचे दिवे आणि अन्य साहित्य जप्त करून येथील सर्व कनेक्शन तोडून टाकले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील वायरच्या गुंतागुंतीच्या गाठी सोडवण्यात आल्या आहेत, त्यामुळे येथील प्रत्येक गाळा आता स्वच्छ दिसून येत आहे. (Hindustan Post Impact)
आजवर येथील प्रत्येक गाळ्यांमध्ये दिवसा चोरीच्या दिव्यांचा वापर केला जात होता, परंतु बेस्टच्या कारवाईनंतर सलग तिसऱ्या दिवशी या पुलाखालील प्रत्येक भागांमध्ये विजेच्या प्रकाशविना व्यवसाय करताना दिसत आहे. ही चोरी मागील अनेक वर्षांपासूनची असून यामुळे बेस्ट उपक्रमाचा कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. चोरीच्या विजेवर आपला व्यवसाय प्रकाशमय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या काळ्या कारनाम्याची माहिती आता ही वीज चोरी उघड झाल्याने स्थानिकांना दिसून आली आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी पुन्हा वीज चोरी होणार नाही याची खबरदारी बेस्ट आणि महापालिका प्रशासनाने घ्यायला हवी असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. (Hindustan Post Impact)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community