Hindustan Post Impact : महापालिकेला जनतेला सुविधा द्यायच्या की मनस्ताप; Borivali Skywalk च्या एका जिन्याच्या दुरुस्तीसाठीच घेतले आठ दिवस

738
Hindustan Post Impact : महापालिकेला जनतेला सुविधा द्यायच्या की मनस्ताप; Borivali Skywalk च्या एका जिन्याच्या दुरुस्तीसाठीच घेतले आठ दिवस
  • सचिन धानजी,मुंबई

बोरीवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील स्कायवॉकबाबत (Borivali Skywalk) ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर या स्कायवॉकच्या एका जिन्याचे बांधकाम तब्बल आठ दिवसानंतर पूर्ण करण्यात आलेले आहे. अतिशय किरकोळ स्वरूपाचे त्या कामासाठी तब्बल आठ दिवस जिना पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद करून ठेवला होता. आठ दिवसानंतर हे काम पूर्ण झाले असले तरी मोक्ष मॉलच्या पलीकडे उतरणारा आणि त्या स्काय वॉक वरील अन्य जिन्यांची दुरावस्था झालेली असताना या सर्व जिन्यांकडे मात्र अद्यापही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. त्यामुळे महापंखा प्रशासनाला खरोखरच जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत की त्यांना मनस्तापच द्यायचे आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. (Hindustan Post Impact)

महापालिका आर-मध्य विभाग कार्यालयाच्या नाकासमोर असलेल्या स्कायवॉकवरील उखडलेल्या लाद्यांमुळे पादचाऱ्यांना धड चालताही येत नाही. पण दिसत असतानाही महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसह पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे, आणि त्यांना आता केवळ प्रतीक्षा आहे की कोणी तरी पादचारी जायबंदी होऊन पडण्याची. त्यामुळे कोणी पडून झडून जखमी झाल्यानंतरच महापालिका या स्कायवॉकची डागडुजीचे काम करणार का असा प्रश्न उपस्थित करत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने ‘महापालिका पूल विभागाच्या डोळ्यावर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची महापालिकेला प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. (Hindustan Post Impact)

(हेही वाचा – Boriwali Skywalk : महापालिकेच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची प्रतीक्षा)

या वृत्तामध्ये असे म्हटले होते की, एका बाजुला सुशोभीकरणाच्या नावावर या स्कायवॉकवर कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रखर दिवे बसवून विद्युत रोषणाई करण्यावर भर देणाऱ्या महापालिका पूल विभागाला येथील प्रत्येक जिन्यावरील उखडलेल्या लाद्या आणि त्यांच्या लोखंडी पट्ट्या वर आलेल्या दिसत नाही. एस व्ही रोडवरील पोलिस स्टेशनसमोरील जिना आणि त्यानंतर गाला ऑप्टिक्स कडे जिना आणि मोक्ष मॉलकडे दोन्ही बाजुला उतरणारे जिने यांच्या पायऱ्यांवरील लाद्या मागील अनेक महिन्यांपासून उखडलेल्या गेल्या आहेत. या लाद्या उखडल्याने आता समोरील लोखंडी पट्टी राहिलेली असून नागरिकांना या सर्व जिन्यांवरून उतरताना किंवा चढताना डोळ्यात तेल घालून चालावे लागते. हे जिने चढताना किंवा उतरताना कुणा पादचाऱ्याचा लक्ष विचलित झाल्यास त्यांना लोटांगण घालण्याची वेळही येते. आजवर या घटना घडत असताना कोणतीही मोठी दुर्घटना न झाल्याने पूल विभागाचे अधिकारी बेफिकीरपणे वागत आहे. (Hindustan Post Impact)

New Project 2024 06 27T195751.439

जून महिन्यातील १८ तारखेला याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून या पुलाच्या मोक्ष मॉल कडे उतरणाऱ्या जिन्याचे काम हाती घेतले. यासाठी जिन्याचा प्रवेश मार्ग दोन्ही बाजूने बंद करण्यात आला. या जिन्यावर काही भागात उखडलेल्या लाद्या बसवणे हेच काम अपेक्षित होते. अगदी शुल्लक असलेल्या या कामासाठी महापालिकेने हा जिना तब्बल आठ दिवसांपासून बंद करून हे काम केले. गुरुवारी सकाळी हे काम झाल्यानंतर हा जिना बंद करून ठेवला होता. मात्र काही पादचाऱ्यांनी अडथळा तोडून या जिन्यांचा वापर केल्याचे गुरुवारी दिसून आले. मात्र हा जिना आता चालण्यास सुस्थितीत आला असला तरी या जिन्याच्या दुरुस्तीच्या कामांसाठी आठ दिवसांचा कालवधी घेतला. तरी या स्कायवॉकचा एसव्ही रोडच्या पलीकडच्या बाजूला मॉल समोरील बाजुस उतरणाऱ्या जिन्याची अद्यापही दुरावस्थाच आहे. पालिकेने एक जिना दुरुस्त करण्यास आठ दिवस घेतल्याने या ठिकाणी जाणाऱ्या कॉलेज तरुणांसह पादचाऱ्यांना या तुटक्या फुटक्या जिन्याचा वापर करावा लागत आहे. मात्र या जिन्यासह गाला ऑप्टिक्स कडे उतरणारा जिना, पुढे पिपासासमोरील बाजूस असणाऱ्या जिना, भाजी मार्केटकडे उतरणारा जिना, महापालिका आर उत्तर विभाग कार्यालयाकडे उतरणारा जिना आणि पुढील बाजुस चंदावरकर रोडच्या दिशेने उतरणारा जिना या सर्व जिन्यांची अध्यापही दुरावस्थाच आहे. (Hindustan Post Impact)

(हेही वाचा – Borivali Skywalk : कंत्राटदार नियुक्त तरीही बोरीवली स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष)

त्यामुळे एक जिना दुरुस्त करायला आठ दिवस घेतले जाणार असतील तर या संपूर्ण स्काय वॉकवरील दुरावस्था झालेल्या सर्व जिन्यांची डागडुजी करण्यासाठी महापालिका आणि त्यांनी नियुक्त केलेला कंत्राटदार आणखी किती दिवस घेतील, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महापालिकेने ज्या कंत्राटदाराकडून हे काम करून घेतले आहे, त्यांच्याकडे कुशल कामगार आहे कि नाका कामगारांची मदत घेऊन हे काम करतात असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. एका जिन्याच्या किरकोळ दुरुस्तीच काम अवघ्या एका दिवसाचे असताना त्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला तर उर्वरीत खराब झालेले जिने आणि स्कायवॉकवरील खराब झालेले जिने दुरुस्त करायला महापालिका किती दिवस घेईल असाही सवाल उपस्थित होत आहे. (Hindustan Post Impact)

बोरीवली (पश्चिम) येथील एस व्ही मार्गावरील सध्या अस्तित्वात असलेली आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए) मार्फत सन २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक सन २०१५ साली एम.एम.आर.डी.ए. कडून “जसे आहे तसे” या तत्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. त्यानुसार या स्कायवॉकची देखभाल महापालिकेच्यावतीने केली जात आहे. बोरीवली पश्चिम भागातील नागरिकांना एस व्ही रोडवरील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना धड चालता येत नाही म्हणून रेल्वे स्थानक थेट गाठण्यासाठी या स्कायवॉकचे बांधकाम करण्यात आले. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात याची योग्य देखभालच महापालिकेच्यावतीने योग्य प्रकारे केली जात नाही. (Hindustan Post Impact)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.