दादर पश्चिम येथील एन.सी.केळकर मार्गावरील गोल देऊळ (Hindustan Post Impact) अर्थात हनुमान मंदिर म्हणून प्रसिध्द असलेल्या मंदिराभोवती पडलेला खड्ड्यांचा विळखा अखेर सुटला. याबाबतचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने शनिवारी (२२ जुलै) प्रसिद्ध केल्यानंतर रविवारी पहाटे या भागातील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील खड्ड्यांचे साम्राज्य दूर झाले असून खड्ड्यांमुळे होणारी संथ वाहतूकीचा मार्गही आता सुरळीत झाला आहे.
दादर पश्चिम येथील एन.सी.केळकर मार्गावरील गोल मंदिर अर्थात हनुमान मंदिर म्हणून प्रसिध्द असलेल्या मंदिराला खड्डयांनी विळखा घातला होता. या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी तसेच मागील बाजुस खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. याठिकाणी वाहने वळसा घालून जात असली तरीही या खड्डयांमुळे तेथील वाहतुकीला पूर्णपणे ब्रेक लागला होता.
(हेही वाचा – Landslide : अंधेरी पूर्व मधील चकाला येथे दरड कोसळून काही घरांचे नुकसान)
या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ काही दिवसांपूर्वी पडलेल्या खड्डयांवर जी उत्तर विभाग कार्यालयाच्यावतीने कोल्ड मिक्सचे मटेरियल टाकले होते. परंतु हे कोल्डमिक्सचे मटेरियल पावसात वाहून गेल्यानंतर या भागासाठी नियुक्त केलेल्या संस्थेद्वारे रिऍक्टीव्ह अस्फाल्टद्वारे हे खड्डे बुजवण्यात आले होते. हे रिऍक्टीव्ह अस्फाल्ट अत्यंत टिकावू असल्याचा दावा रस्ते विभागाने केला होता. परंतु मागील चार दिवसांपासून या खड्डयांतील मटेरियल निखळून वाहून गेल्याने त्या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले होते.
याबाबतचे ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दादरच्या गोल देऊळाला खड्ड्यांचा विळखा, रिएक्टीव्ह अस्फाल्ट फेल झाले या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर रस्ते विभागाने या वृत्ताची दखल घेत रविवारी पहाटे या भागातील सर्व खड्डे बुजवले. अस्फाल्ट थर चढवून त्यांचा एक पट्टा त्या खड्डे परिसरात मारून हे खड्डे बुजवले गेले. त्यामुळे मंदिराच्या प्रवेश द्वारासमोरील आणि मागील बाजूस असलेले खड्डे बुजवले गेले. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याठिकाणी तैनात वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या संबंधित अभियंता वर्गाचे आभारही मानले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community