चहा- काॅफीचे व्यसन जरा कमी करा, कारण

161

आता अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यातच आता चहा काॅफीचे व्यसन असणा-यांना मात्र ते कमी करावे लागणार आहे, कारण सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, हिंदुस्थान युनिलिव्हरने ब्रु काॅफीचे दर तीन ते सात टक्क्यांनी वाढवले आहेत.

तब्बल इतक्या टक्क्यांची वाढ

ब्रू गोल्ड काॅफीच्या प्रती पॅक मागे तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ब्रु इन्स्टंट कॉफी पावची किंमत सहा टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. कंपनीने चहाच्या  किमतीमध्ये देखील वाढ केली असून, ताजमहाल चहाच्या किमतीमध्ये 3.7 ते 5.8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर ब्रूक बॉंड टीची किंमत तब्बल 14 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. भाववाढीबद्दल कंपनीकडून खुलासा देखील करण्यात आला आहे. कच्चा माल महाग झाला आहे, तसेच मनुष्यबळदेखील महागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या किमतीमध्ये उत्पादनाची विक्री करणे परवडत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

( हेही वाचा :TheKashmirFiles काश्मिरी पंडितांचा आवाज पुन्हा दाबण्याचा प्रयत्न झाला, पण…)

एका वर्षात दोनदा वाढ

हिंदुस्थान युनिलिव्हरने नवीन वर्षात सलग दुस-या महिन्यात उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. या कंपनीने आंघोळीचे, धुण्याचे साबण तसेच टाल्कम पावडरच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे उत्पादन घटकांच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याने कंपनीने किमती वाढवल्या आहेत. गेल्या महिन्यात हिंदुस्थान युनिलिव्हरने साबण आणि कपडे धुण्याच्या पावडरच्या किमतीमध्ये वाढ केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.