31 जानेवारीला राज्यातील काही शहरांमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांना चिथावण्याचा आरोप असणा-या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याच्यासह इकरार खान वखार खान याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला न्यायालयात हजर करण्याचीही शक्यता आहे.
हिंदुस्थानी भाऊला अटक
ऑनलाईन शिकवणी केली आणि परीक्षा ऑफलाईन होतेय म्हणून हजारो विद्यार्थी धारावी परिसरात रस्त्यावर उतरले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. बिग बाॅस फेम आणि प्रसिद्ध सोशल मिडीया स्टार हिंदूस्थानी भाऊ याच्या आवाहनानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर कारवाई करत, धारावी पोलिसांनी आता हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे.
या कलमाखाली अटक
धारावी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३, ३३२, ४२७, १०९, ११४, १४३, १४५, १४६, १४९, १८८, २६९, २७० भा.द.वि.सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३), १३५ जमाव बंदी आदेश भंग सह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984.
( हेही वाचा: ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक; विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्याच्या घराला घेराव )
परीक्षा ऑनलाईन घ्या
31 जानेवारी रोजी धारावी नाईंटी फिट रोडवर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रस्त्यावर मोठे आंदोलन केले. परीक्षा ऑनलाईन व्हावी म्हणून विद्यार्थी आग्रही आहेत. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात, म्हणून धारावी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर आता धारावीमध्ये जो विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून, त्याला आणि इतर काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community