-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दादर पश्चिम येथील सेनापती बापट चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडे जाणाऱ्या समर्थ व्यायाम मंदिर मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची वृत्त’ हिंदुस्थान पोस्ट ‘ने प्रकाशित करून ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर चिरा पडलेला भाग तोडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम हाती घेतले आहे. ‘ हिंदुस्तान पोस्ट ‘च्या वृत्तानंतर अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांच्या निर्देशानुसार रस्ते कंत्राटदाराने तात्काळ याच्या दुरुतीचे काम हाती घेत रस्ता तोडून नव्याने बनवून घेण्यास सुरुवात केली आहे. (Hindusthan Post impact)
(हेही वाचा- तुमचा Mukhyamantri Ladki Bahin योजनेचा अर्ज रद्द झाला आहे का ? प्रशासनाने केले ‘हे’ आवाहन)
दादर पश्चिम येथील सेनापती बापट चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडे(शिवाजी पार्क) जाणाऱ्या समर्थ व्यायाम मंदिर मार्गाचे सिमेंटीकरण करण्याचे काम मागील दोन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे,हा मार्ग केळुस्कर मार्ग दक्षिण आणि राऊत मार्ग यांना छेदून जात आहे. पूर्वी हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा होता. परंतु हा रस्ता जुन झाल्याने यावर मोठ्याप्रमाणात भेगा पडल्या होत्या. त्यामुळे पूर्वीचा रस्ता तोडून नव्याने रस्ता बनवण्यात आला. परंतु रस्ता बनवल्याने पहिल्याच पावसाळ्यात यावर तडे पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर याबाबतची वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर मॅनहोल्सच्या परिसरातील भाग तोडून नवीन बांधकाम करण्यात आले. परंतु त्यानंतरही अनेक भागांमध्ये तडे दिसून आल्यानंतर या रस्त्यांच्या बांधकामाची तपासणी करण्याच्या दृष्टीकोनातून सॅम्पल टेस्ट घेण्यात आली. त्यात रस्त्यावरील हे तडे वरील भागांत नसून खालच्या भागापर्यंत पसरल्याचे अहवालात दिसून आले. त्यामुळे या रस्त्यांचे बांधकाम तोडून नवीन बांधणे आवश्यक असल्याचे मतही तज्ज्ञांनी नोंदवले आहे. (Hindusthan Post impact)
परंतु आजवर वाहतूक पोलिस परवानगी देत नाही तसेच या रस्त्याचे पुन्हा बांधकाम केल्यास या परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण होईल अशी कारणे देत तडे गेलेल्या या रस्त्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सेनापती बापट चौकापासून ते शिवाजी पार्क प्रवेशद्वार आदी परिसरात हे तडे गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आरे कॉलनीतील मुख्य रस्त्यांच्या निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून ज्याप्रकारे पुन्हा खराब झालेला भाग पुन्हा करून घेतला जाणार आहे,तसा समर्थ व्यायाम मंदिर मार्गही पुन्हा बांधून घेतला जाणार आहे का असा सवाल जनतेकडून केला जात आहे. (Hindusthan Post impact)
विशेष म्हणजे या रस्त्यांखालून विविध सेवांकरता वाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे युटीलिटीजच्या सेवांसाठी रस्त्याखाली चांगले बांधकाम झालेले असताना प्रत्यक्षात पृष्ठभाग खराब झाल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्ट ने ‘दादरचा समर्थ व्यायाम मंदिर मार्गाला तडे, दोन वर्षांतच झाली रस्त्याची दुरवस्था’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केल्यानंतर महापलिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) आणि अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दखल घेत रस्ते प्रमुख अभियंता गिरीश निकम (Girish Nikam) यांना निर्देश देत संबंधित कंत्राटदार यांच्याकडून या रस्त्याचे खराब काम पुन्हा करून घ्यावे असे निर्देश दिले. त्यामुळे रस्ते विभागाच्या सूचनेनुसार संबंधित कंत्राटदार कंपनीने १७ ऑगस्ट पासून या रस्त्यावरील ज्या भागात अधिक भेगा पडल्या होत्या , त्या भागातील सिमेंटचा रस्ता तोडून त्या जागेवर नव्याने सिमेंट काँक्रीटीकरण करून देण्याचे काम हाती घेतले आहे. रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,वाहतुकीची गैरसोय होऊ नये याकरता टप्प्याटप्प्यात खराब भागातील रस्त्याचे काम तोडून नवीन बांधकाम करून घेतले जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाले आहे. (Hindusthan Post impact)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community