Ullas : राज्यात केंद्रपुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या (Ullas Nav Bharat Saksharta Karyakram) अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी राज्यभरात रविवारी पार पडली. ६.५ लाख निरक्षरांनी परीक्षा दिली. ७० वर्षांवरील आजी-आजोबांचा नवसाक्षर होण्याचा निर्धार या परीक्षेत दिसला. (Ullas)
(हेही वाचा – कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करत आहोत, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार ; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा इशारा)
राज्यात एकूण ८.०४ लाख निरक्षरांची नोंदणी झाली होती, त्यापैकी ६.५ लाख निरक्षरांनी परीक्षा दिली. ५३ हजार २७१ परीक्षा केंद्रांवर (Examination Centre) ही चाचणी घेण्यात आली. परीक्षा केंद्रांवर निरक्षर परीक्षार्थीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला परीक्षार्थीचा सहभाग विशेष लक्षणीय होता. विशेष म्हणजे ७० वर्षांवरील आजी-आजोबांनीही नवसाक्षर होण्याचा संकल्प सोडत आत्मविश्वासाने परीक्षा दिली. काहींना वाचता आणि लिहिता आले नव्हते, पण शिकण्याची उमेद आणि जिद्द त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आता सही करता येणार, सर्व वाचता येणार अशा प्रतिक्रिया अनेक वृद्ध परीक्षार्थीनी दिल्या. जे निरक्षर केंद्रावर येऊ शकत नव्हते, त्यांच्यासाठी घरी परीक्षा देण्याची विशेष सोय करण्यात आली होती.
मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली अशा ९ माध्यमांमध्ये ही परीक्षा झाली. या परीक्षेमुळे नवसाक्षरांना आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्य जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या जीवनकौशल्यांचा विकास होणार आहे. शिक्षण विभागाकडून उत्तीर्ण परीक्षार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, याचा फायदा त्यांना भविष्यातील रोजगार संधी (Employment opportunities) मिळवण्यासाठी होणार आहे.
(हेही वाचा – Maulana Sajid Rashidi यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, मराठा राजांना मारून…)
या शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Minister Education Pankaj Bhoyar), शिक्षण आयुक्त एस. पी. सिंग, केंद्रीय निरीक्षक प्रदीप हेडाऊ, कक्ष अधिकारी, गगन कुमार कामत, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर, सहाय्यक संचाल किरण शिरोळकर तसेच जिल्हा परीक्षा निरीक्षकांनी विविध केंद्रांना भेटी देऊन परीक्षार्थीचा आत्मविश्वास वाढवला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community