शेतक-यांचा ऐतिहासिक विजय; पेप्सिको कंपनीचे बटाट्याचे पेटंट रद्द

145

भारताने पेप्सिको कंपनीचे भारतातील बटाटा जातीचे पेटंट रद्द केले आहेत. असा आदेश प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अॅन्ड फार्मर्स राईट्सने दिला आहे. खर तर पेप्सिको कंपनीच भारतात पाॅपुलर ‘लेस चिप्सचे’ प्रोडक्शन करते. त्यामुळे पेप्सिकोसाठी हा मोठा धक्का आहे.

काय आहे प्रकरण 

2019 मध्ये पेप्सिको कंपनीने गुजरातमध्ये राहणा-या शेतक-यांवर गुन्हा दाखल केला होता. शेतक-यांनी पिकवलेले एफसी5 जातीचे बटाट्याचे उत्पन्न घेतल्याबद्दल या कंपनीने तक्रार केली होती. पण, नंतर अमेरिकेतील न्यूयाॅर्क शहरात असलेल्या या कंपनीने शेतक-यांवरील केस मागे घेतली आणि आपसी सहमतीने यावर तोडगा काढण्याचे सांगितले होते. दोन वर्षांच्या खटल्यानंतर प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अॅन्ड फार्मर्स राईट्सने पेप्सिको कंपनीचे पेटंट रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.

पेप्सिको कंपनीला मोठा धक्का

कविता कुरुगांती या शेतक-यांच्या हितासाठी काम करतात. त्यांनी या कंपनीच्या विरोधात प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अॅन्ड फार्मर्स राईट्समध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेत पेप्सिकोला मिळालेल्या एफसी5 या बटाट्याच्या जातीचे पेटंट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, भारतात जे पीकं घेतले जाते त्याच्या बियांचे पेटंट देण्याची परवानगी नसते असंही कविता यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. या बाबीवर प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अॅन्ड फार्मर्स राईट्सने सहमती दर्शवली आणि त्यानंतर अध्यक्ष केवी प्रभू यांनी पेटेंट रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शेतक-यांचा मोठा विजय झाला असून, पेप्सिको कंपनीला मात्र धक्का बसला आहे.

 ( हेही वाचा :केरळला सीरिया बनवण्याचा कट! शाळकरी मुलांचा वापर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.