एकेकाळी गावाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असलेले भगूर (Bhagur) सार्वजनिक वाचनालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाचनालयाची स्थापना १९६५ मध्ये भगूर नगरपरिषदेने नागरिकांसाठी केली होती आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. रोज शेकडो वाचक येथे येऊन वर्तमानपत्रे, पुस्तके आणि ग्रंथ वाचत असत. मात्र, सध्या हे वाचनालय दुर्दैवाने ओस पडले आहे.
हजारो ऐतिहासिक पुस्तके आणि ग्रंथ धुळखात पडून
नगरपरिषदने काही वर्षांपूर्वी वाचनालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून तेथे व्यापारी संकुल उभे केले. परंतु, वाचनालयाला योग्य जागा न देता, ते जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत हलविण्यात आले. या हलचालीमुळे वाचनालयाच्या वाचकसंख्या हळूहळू कमी होत गेली आणि अखेर वाचनालय बंद करण्यात आले. सध्या वाचनालयातील हजारो ऐतिहासिक पुस्तके आणि ग्रंथ धुळखात पडून आहेत. हा ठेवा जर योग्य ती काळजी घेतली नाही तर लवकरच नष्ट होईल. स्थानिक नागरिकांनी या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि वाचनालयाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचा Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट)
भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह भगूर (Bhagur) यांनी याबाबत भगूर नगर परिषदेचे लक्ष वेधले आहे. त्यांनी वाचनालयाचे महत्त्व पटवून दिले आणि ते नवीन स्वरूपात सुरू करण्याची मागणी निवेदणाद्वारे केली आहे.
समूहाच्या मनोज कुवर यांनी सांगितले की, वाचनालयाच्या पुनरुज्जीवनाने गावातील मराठी साहित्य, इतिहास, आणि सांस्कृतिक वारसा जपला जाऊ शकतो, ज्यामुळे स्थानिक संस्कृतीची जपणूक होईल तसेच व्यक्ती आणि समाज दोन्हीचा विकास साधता येईल. नगर परिषदेने या मागणीवर विचार करून, वाचनालय पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन द्यावे, अशी अपेक्षा आहे. हे वाचनालय गावाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासात पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
Join Our WhatsApp Community