छत्रपती शिवाजी महाराजांविना भारताचा इतिहास अधुरा; Vice President Jagdeep Dhankhar यांचे प्रतिपादन

131
महाराष्ट्राच्या या महान पूण्यभूमीत येऊन मला आनंद झाला. मी भूमीला नमन करतो. ही भूमी बलिदानाची आहे. भारताचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विना अधुरा नाही, तर रिकामा वाटतो, अशी भावना उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी व्यक्त केली. ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारांना मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची उपस्थिती होती.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित रहायला मिळणे हा मोठा सन्मान आहे. या पवित्र सभागृहात माझे विचार मांडण्याची मौल्यवान संधी दिल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचा मी आभारी आहे. या सभागृहाने सुरुवातीपासूनच लोकसेवेची भावना कायम राखली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचा यंदा शताब्दी सोहळा आहे. या महत्वपूर्ण टप्प्यावर दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करणे हे खरोखर विशेष आहे.

महाराष्ट्र ही बलिदानाची भूमी

जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) म्हणाले की, समृद्ध इतिहास, चैतन्यदायी संस्कृती आणि गतिमान अर्थव्यवस्थेसह महाराष्ट्र राज्य हे सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. सह्याद्रीच्या चित्तथरारक निसर्गरम्य पर्वतरांगा आणि कोकणातील नितळ समुद्र किनारे या राज्याला लाभले आहेत. महाराष्ट्र हे आज देशाला नव्या उंचीवर नेणारी महाशक्ती आहे. या महान पुण्यभूमीत आल्यावर मला एक गीत आठवते. देखो मुल्क मराठों का यह यहां शिवाजी डोला था, मुग़लों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग जली थी हर पत्थर एक शोला था, बोली हर-हर महादेव की बच्चा-बच्चा बोला था, शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, मैं इस धरती को नमन करता हूँ। शिवाजी महाराजांच्या या महान भूमीने शतकानुशतके आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे नेतृत्व करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि भारताच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले आहे. मराठा स्वराज्याची तत्त्वे, विकेंद्रित राजकारण, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांना प्रशासकीय चौकटीत समाविष्ट करून जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि प्रतिसाद प्रेरित करणारे मॉडेल आहे.

प्राचीन काळापासून लोकशाही मुल्ये रुजली

उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) म्हणाले की, आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्या लोकशाहीचे हृदय असलेल्या निवडणुकांशी संबंधित संविधानाच्या भाग XV मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचा समावेश करून त्यांना अभिमानाचे स्थान दिले आहे. माननीय सदस्य- लोकशाहीच्या या वंदनीय संस्थेचे आमदार आणि संरक्षक या नात्याने तुम्ही जनतेच्या हिताचे रक्षण करण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडता. पक्षपाती भूमिका बाजूला ठेवून, भारतातील सर्व नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करत समान हिताच्या तत्त्वांशी एकरूप होऊन जुळवून घेणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. माननीय सदस्यहो ! प्राचीन काळापासून भारतात लोकशाही मूल्ये खोलवर रुजलेली आहेत आणि यात आश्चर्य नाही की एक षष्ठांश मानवतेचे घर असलेला भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीची जननी देखील आहे ज्याच्याकडून जगभरातील देश सल्ला घेतात !

भारताने लोकशाहीचा आदर्श घालून दिला

समकालीन जागतिक परिस्थितीत, अभूतपूर्व आर्थिक उन्नती आणि राजनैतिक सामर्थ्यासह भारताची प्रासंगिकता अभूतपूर्व आहे. आणि ती वेगाने वाढत असून आता थांबवता येणार नाही. या पार्श्वभूमीवर, आपल्या देशातील लोकशाही आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण हा विषय अत्यंत समयोचित आहे. भारताने लोकशाहीचे आदर्श उदाहरण म्हणून उदयाला यायला हवे, असेही ते म्हणाले.

नैतिकता आणि सदाचार हे जीवनाचे वैशिष्ट्य

नैतिकता आणि सदाचार हे प्राचीन काळापासून भारतातील सार्वजनिक जीवनाचे वैशिष्ट्य राहिले आहे. नैतिकता आणि सदाचार हे मानवी वर्तनाचे अमृत आणि सार आहेत. हे सार्वजनिक जीवनाचे अविभाज्य पैलू आहेत आणि संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. संसद आणि राज्य विधिमंडळे म्हणजे लोकशाहीचे ध्रुवतारा आहेत. संसद आणि विधिमंडळाचे सदस्य हे दीपस्तंभ असतात. त्यांनी अस्सल वर्तनाचे अनुकरण करणे आवश्यक आहे. लोकशाही मूल्ये नियमित जोपासण्याची गरज आहे. सर्वत्र सहकार्य आणि उच्च नैतिक दर्जा असेल तेव्हाच ती बहरतील, असेही धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) म्हणाले.

तीन शाखांनी योग्य कार्य केले पाहिजे

राष्ट्र अखंडपणे, सुरळीतपणे आणि वेगाने तेव्हाच प्रगती करते जेव्हा त्याच्या विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तीन शाखा आपापल्या क्षेत्रात कार्य करतात. सत्तेच्या पृथक्करणाच्या सिद्धांताचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे, असेही धनखड म्हणाले.

कायदे हे विधिमंडळ आणि संसदेचे अनन्य क्षेत्र आहे, जे घटनात्मक निर्देशपत्राच्या अधीन आहे. स्पष्ट वैधानिक निर्देशपत्राच्या पार्श्वभूमीवर कार्यपालिका आणि न्यायपालिकेने निर्देश दिल्याची बरीच उदाहरणे आहेत. या उल्लंघनांचे सर्वसंमतीने ठराव घेण्यास विधीमंडळे घटनात्मकदृष्ट्या बांधील आहेत. आपल्या लोकशाहीच्या या स्तंभांच्या शिखरावर असलेल्या लोकांमध्ये परस्परसंवादाची संरचित यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा या रंगभूमीचा पवित्र परिसर, लोकशाहीची मंदिरे ते चांगल्या प्रकारे आचरणात आणतील. राज्याच्या तिन्ही शाखांनी एकसंधतेच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. संपूर्ण जगासाठी आदर्श असलेल्या लोकशाहीसाठी हे सामंजस्य महत्त्वाचे आहे.

पक्षामधील संवाद हरपला

सध्या आपल्या संसदेचे आणि विधिमंडळांचे कामकाज सुरळीत नाही हे उघड आहे. लोकशाहीच्या या मंदिरांचा रणनीतीबद्ध व्यत्यय आणि अशांततेद्वारे पावित्र्यभंग होत आहे. पक्षांमधील संवाद हरपला आहे आणि भाषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. याबाबत मी राज्यसभेच्या नैतिक आचार समितीला निर्देश करू इच्छितो जी देशातील अशा प्रकारची पहिलीच समिती आहे. गेल्या शतकाच्या अखेरीस त्याचे संविधान म्हणजे भारतीय संसदेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना होती. असे काही करू नका, ज्यामुळे सभागृहाची बदनामी होईल, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड  (Vice President Jagdeep Dhankhar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.