भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आता मोबाइल ॲपवर

125

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आता मोबाइल ॲपवर उपलब्ध होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सोमवारी १२ सप्टेंबरला या अॅपचे लोकार्पण केले जाणार आहे.

( हेही वाचा : सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या बदलीत प्रिंटींग मिस्टेक?)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड- १ ते १३’ असे या अॅपचे नाव असून, त्यात आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या १३ खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाटय मंदिर येथे १२ सप्टेंबर रोजी या अॅपचे लोकार्पण केले जाणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनांवर कार्यक्रम

लोकार्पण सोहळयादरम्यान स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या ‘अज्ञात पैलू’, तसेच मराठी, हिंदी, उर्दु भाषेतील निवडक रचनांवर आधारित ‘यशोयुताम् वंदे’ हा कार्यक्रम होणार असून, पुणे येथील कलासक्त संस्थेच्या २५ नृत्यांगना त्यावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमात पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीद्वारे प्रायोगिक नाट्यगृहाचे उट्घाटन होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.