राज्यात आता थंडीने (Winter) परतीचा मार्ग धरला आहे. कारण राज्यात पारा वाढत चालला आहे. रविवार अकोल्यात सर्वाधिक ३६.८ अंश सेल्सियस इतके कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात सर्वात कमी १५.५ सेल्सियस किमान तापमान होते. त्यामुळे राज्यात थंडीने आता माघार घेतल्याचे वातावरण आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे आकाश निरभ्र आहे. परिणामी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा चढाच राहिला. नांदेडमध्ये ३५.८, परभणीत ३६.५, तर उत्तर महाराष्ट्रात जळगावात, मालेगावात ३६.२. मध्य महाराष्ट्रातील सांगलीत ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत किनारपट्टीलगत कमाल तापमान कमी राहिले, सरासरी तापमान ३२.० अंश सेल्सिअस होते. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाल तापमानात सरासरी १.० अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून थंडी (Winter) कायमची कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात एका पाठोपाठ तीव्र पश्चिमी झंजावात सक्रिय होत आहेत. त्यामुळे उत्तर भारतात काहीशी थंडी आहे.
Join Our WhatsApp Community