HMPV Virus : एचएमपीव्ही विषाणूचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम नाही; तज्ञांचा दिलासा

HMPV Virus : भारतीय शेअर बाजारात सोमवारी १.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

42
HMPV Virus : एचएमपीव्ही विषाणूचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम नाही; तज्ञांचा दिलासा
  • ऋजुता लुकतुके

ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही तापाचे भारतातही सहा रुग्ण आढळल्याची बातमी सोमवारी ६ जानेवारीला समोर आल्यानंतर कोव्हिड सदृश तापाच्या भीतीने शेअर बाजारावर त्याचे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाले. दिवसभरात निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन निर्देशांकांत एका टक्क्याच्या वर घसरण बघायला मिळाली. पण, ही घसरण एचएमपीव्ही विषाणूच्या भीतीबरोबरच देशातील बँकिंग क्षेत्र आणि इतर जागतिक घटकांमुळे होती. एचएमपीव्ही विषाणूची भाती बाळगण्याचं सध्या कारण नाही, असं शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितलं आहे. (HMPV Virus)

कर्नाटकात आतापर्यंत या विषाणूचे ६ रुग्ण आढळले आहेत आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक पत्रक काढून या विषाणूच्या प्रसाराविषयी माहिती दिली आहे. ‘आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर नीट लक्ष ठेवून आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून येणारी माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वांचाही आम्ही अभ्यास करत आहोत,’ असं या पत्रकात म्हटलं आहे. (HMPV Virus)

(हेही वाचा – Delhi Assembly Elections ची तारीख जाहीर)

चीनमधील सध्याची परिस्थिती फारशी भीतीदायक नाही, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. स्टेट बँक सेक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, ‘एचएनपीव्ही व्हायरसबद्दल जी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे, ती घाबरवण्यासारखी नाही. हा विषाणू कोव्हिड १९ सारखा भयानक नाही. यामुळे लॉकडाऊन लागेल किंवा प्रवास बंद होईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे शेअर बाजारानेही या विषाणूला घाबरण्याची गरज नाही.’ (HMPV Virus)

इतकंच नाही तर शेअर बाजार विश्लेषक सिद्धार्थ भामरे यांनी बाजारातील घसरणीचं कारण हा विषाणू नाही तर इतर कंपन्यांची घसरण हे असल्याचं म्हटलं आहे. ‘विषाणूची भीती ही तात्कालिक होती. त्यापेक्षा मोठं कारण आहे ते बँकिंग क्षेत्राची कामगिरी आणि खासकरून सरकारी बँकांची घसरण झाली आहे. त्यामुळे पडलेले समभाग बघितले तर त्यात बँकिंग शेअर मोठ्या प्रमाणात आहेत. वित्त क्षेत्राची कामगिरी हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे,’ असं भामरे म्हणाले. (HMPV Virus)

(हेही वाचा – Union Budget मध्ये दिल्लीसाठी केलेल्या योजनांची घोषणा करता येणार नाही; कारण…)

या विषाणूमुळे बाजार पडला असता तर फार्मा किंवा डायग्नोस्टिक कंपन्यांमध्ये वाढ दिसली असती आणि पर्यटन, प्रवास संबंधित शेअर जोरदार पडले असते. पण, तसं झालेलं नाही. मेट्रोपोलिस कंपनीचा शेअरही पडला आहे आणि सगळ्यात जास्त हानी बँकिंग क्षेत्रातील शेअरची झाली. त्यावरून डॉलरसमोर रुपयाची घसरण आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांची खालावलेली कामगिरी, हेच पडझडीचं कारण असावं असं तज्ञांनी बोलून दाखवलं आहे. (HMPV Virus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.