घाटकोपरनंतर Pimpri-Chinchwad शहरात होर्डिंग कोसळले; मात्र मोठी दुर्घटना टळली

145

दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिंग कोसळले. यानंतर पिंपरी – चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) अशीच धक्कादायक घटना घडली. मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. मोशीमध्ये दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात जोरदार वारा आल्याने हे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

(हेही वाचा …तर गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू; Amit Shah यांचा इशारा)

सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले असून यामध्ये चार दुचाकी आणि टेम्पो यांचे बरेच नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नाही, त्यामुळे वाहतुकीला कोणतीच अडचण निर्माण झालेली नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.