Hoax Call : भारतीय विमान कंपन्यांच्या ५० विमानांना बॉम्बच्या धमक्या

27

सध्या भारतीय विमान कंपन्यांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे वाद पेटत आहे. आता ५० विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या (Hoax Call) एका रविवारच्या दिवशी मिळाल्या आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील 14 दिवसांत 380 हून अधिक फ्लाइट्सना अशा खोट्या धमक्या  (Hoax Call) मिळाल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रभावित होत आहेत. सर्वाधिक धमक्या इंटरनेटच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. अकासा एअरने सांगितले की, त्यांच्या 15 फ्लाइट्सना सुरक्षा सूचना मिळाल्या आणि कसून तपासणी केल्यानंतर सर्व विमाने ऑपरेट करण्यासाठी योग्य असल्याचे आढळले.

(हेही वाचा वरळीत विकासकामे झालेली नाहीत; Amit Thackeray यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा)

इंडिगोच्या 18 आणि विस्ताराच्या 17 फ्लाइटना धमक्या  (Hoax Call) आल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, धोक्यानंतर इंडिगोची किमान दोन उड्डाणे वळवण्यात आली. पुण्याहून जोधपूरला जाणारे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले आणि कोझिकोडहून दम्माम (सौदी अरेबिया) जाणारे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. जोधपूर विमानतळावर लँडिंग करणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी  (Hoax Call) मिळण्याची गेल्या 10 दिवसांत ही चौथी वेळ आहे. हे विमान अहमदाबादमध्ये उतरवण्यात आले आणि सुरक्षा तपासणीनंतर ही धमकी बनावट असल्याचे आढळून आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.