केंद्र शासनाने सजीव प्राण्यांच्या प्रजाती (Reporting and Registration) नियम 2024 अधिसूचित केले आहेत. त्यानुषंगाने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची-IV Appendix-l, ll व ll मध्ये समाविष्ठ विदेशी जिवंत प्राणी प्रजातींची नोंदणी करण्याबाबत Wildlife (Protection) Amendment Act दि.20 डिसेंबर 2022अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 कायद्यात सुधारणा करून सुधारित कायदा दि. 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आला आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सुधारित कायद्याअंतर्गत Chapter-IVB मध्ये कलम 49M वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 चे अनुसूची-IV Appendix-I, II व III मध्ये समाविष्ठ जिवंत विदेशी प्राणी प्रजातींची नोंदणी करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे व समाविष्ट विदेशी जिवंत प्राणी प्रजातींची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. (Animal Licence)
(हेही वाचा – Kokan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बोगद्यात पाणी आल्याने ‘या’ गाड्यांचा मार्ग बदलला तर, ‘या’ ९ ट्रेन रद्द)
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 49M अंतर्गत प्रधान मुख्य वनरंक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीवरक्षक यांना व्यवस्थापन प्राधिकरणाचे (Managcment Authority) कार्य करण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. अधिकार प्रदान केल्याप्रमाणे PARIVESH-2 पोर्टलमध्ये Recporing and Registration साठी अधिसूचनेत दिलेल्या प्रारूप-1मध्ये नवीन online अर्ज विदेशी प्राणी (अनुसूची- V चे) ची नॉंदणी करण्याची मुदत 6 महिन्यांची दिलेली आहे, त्यानुषंगाने जिवंत विदेशी प्राणी प्रजातींची नोंदणी Reporting and Registration साठी सर्व आवश्यक कार्यवाही online करावयाची आहे. Online प्रक्रिया पूर्ण करताना जिवंत विदेशी प्राणी प्रजातींची ताबा नोंदणी अर्ज (Application of registration of possession), अहवाल आणि जन्म नोंदणीसाठी अर्ज (Application for reporting and registration of birth)., हस्तांतरणाचा अहवाल आणि नोंदणीसाठी अर्ज (Application for reporting and registration of tansfer), आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या मृत्यूची नोंद करण्याची पध्दत (Manner for reporting death of animal species) या बाबींचा समावेश करण्यात आला आहे, अर्जदार यांना PARIVESH -2 या पोर्टलवर अर्ज प्राप्त होणार असून रु.1 हजार भरून प्रारूप-1 मध्ये online अर्ज सादर करता येणार आहे.
…तर अर्ज नाकारला जाणार
प्रत्यक्ष मौका तपासणीत काही त्रृटी किंवा अर्जदाराचे जबाब असमाधानकारक आढळल्यास त्यांचा अर्ज नाकारण्यात /Reject करण्याची तरतूद आहे. याबाबत लेखी स्वरूपात स्वाक्षरीसह अहवाल online परिवेश-2 पोर्टलवरच upload करण्यात येईल. क्षेत्रीय कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यावर उपनियम (2) नुसार संबंधित अर्जदारास 15 दिवसाच्या आत Registration नोंदणी ताबा प्रमाणपत्र प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडून जारी करण्यात येईल.
अर्ज कसा करावा ?
ज्या इसमाकडे अनुसूची-IV चे विदेशी प्राणी दि.29 फेब्रुवारी 2024 अगोदर पासून आहे व त्यांनी केद्र शासनाची दि.16 जून 2020 च्या ॲडवाईजरी नुसार मुख्य वन्यजीवरक्षककडे नोंदणी केली असेल त्यांना सुध्दा नवीन नियमानुसार पुनर्नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. ज्यांनी अगोदर ‘नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांचा अर्ज प्रलंबित आहे त्यांनी सुध्दा नवीन नियमांतर्गत अर्ज करावे. अर्ज करण्याची मुदत नियम अधिसूचीत झाल्याच्या 6 महिन्याच्या आत म्हणजे दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राहील. मुदतीच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. ज्या लोकांनी दि. 29 फेब्रुवारी 2024 नंतर विदेशी प्राणी (अनसूची-IV) प्राप्त केलेले नसतील किंवा पुढे प्राप्त करतील, असे लोकांनी संबंधित प्राणी प्राप्त केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी नियमानुसार अर्ज करणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारची नोंदणी मुदतीच्या आत नोंदणीसाठी अर्ज केल्याशिवाय असे विदेशी प्राणी ठेवणे, हा अधिनियमाचा भंग समजला जाईल व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 51(1) अन्वये शिक्षेस पात्र राहील, याची संबंधितानी नोंद घ्यावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community