येत्या रविवारी होणारा होळीचा सण आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होणारा रंगपंचमीचा सण याकरता मुंबईच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विशेष म्हणजे कोविडनंतर रंगपंचमीच्या सणाकरता दादरसह अनेक ठिकाणी पाण्याचा मारा करणाऱ्या पिचकारीसह, बंदुकीची विक्री मोठ्याप्रमाणात विक्रीकरता आल्या असून असून यंदा चायना ऐवजी चक्क स्वदेशी उत्पादित वस्तूच विक्रीकरता बाजारात आल्या आहेत. सुमारे ५० ते १०० रुपयांपासून ते ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पाण्याचा मारा करणाऱ्या बंदुकीसह पिचकारी उपलब्ध आहे. तसेच रासायनिक रंगापेक्षा साध्या तथा हर्बर रंगाची विक्री बाजारात मोठ्याप्रमाणात केली जात आहे. (Holi Festival 2024)
रविवारी होळीचा सण असून या होलिकोत्सव साजरा करण्यासाठी विविध इमारती आणि मंडळांच्यावतीने लाकडांची शोधशोध सुरु होऊन त्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, होळी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगाचा सण साजरा होतो. त्यामुळे या रंगपंचमीच्या सणासाठी बच्चे मंडळींसाठी पाण्याचा मारा करणारे फुगे, पिचकारी बाजारात आल्या असून यंदा प्रथमच चायना मेड पिचकाऱ्यांना स्थानच देण्यात आले नाही. त्यामुळे भारतीय उत्पादित प्लास्टिकच्या पिचकारींच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून बच्चे मंडळींसाठी बाजारात मोटू पतलू, स्पायडरमॅन, छोटा भीम, मिकी माऊस, बार्बी आदींच्या वॉटर गन आल्या आहेत. दादरसह बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, मरीन लाईन्स, वांद्रे पश्चिम, खार, सांताक्रुझ, कांदिवली, मालाड, गोरेगाव, बोरीवली, मुलुंड, वडाळा, लालबाग आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात रंगपंचमीच्या सणाकरता पाण्याच्या पिचकारी आणि रंगांची विक्रीचे स्टॉल्स थाटले गेले आहेत. (Holi Festival 2024)
(हेही वाचा – Mono Service: वडाळा स्थानक-चेंबूरदरम्यान रविवारी सकाळी मोनो सेवा बंद राहणार, कारण? वाचा सविस्तर….)
यंदा बाजारात विक्रीला साधे रंग आणि हार्बर रंगच
रंगपंचमी करता विविध स्वरुपात पाण्याच्या पिचकारी आदींची विक्री करणारे दादर पश्चिम जावळे मार्गावरील येथील सिध्दनाथ स्नॅक्ससमोरी विक्री करणारे विक्रेते राजू मोरे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना यंदाही एकही वस्तू चायना मेड नसून आपल्याच ठिकाणी बनवलेल्या आहेत. आपल्याकडे १०० ते ८०० रुपयांपर्यंत पिचकारी असून यामध्ये वॉटर गन, शुटर गन, मिनी टँक आदी विविध प्रकारच्या पिचकारी आहेत, तसेच बच्चे मंडळींच्या आवडत्या कार्टुनची छायाचित्रे असलेल्या या पिचकाऱ्यांना बच्चे मंडळींची पसंती असल्याचे त्यांनी सांगितले. तर जावळे मार्गावरील आराधन स्नॅक्समोरील विक्री करणारे निलेश शेलार यांनी मात्र, आता पहिल्याप्रमाणे व्यवसाय होत नसल्याची खंत व्यक्त केली. पूर्वी हा व्यवसाय आठ दिवस चालायचा. परंतु आता आता व्यवसाय दोनच दिवसच असतो. खरेदी केलेला माल विक्री न झाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते. सध्या आपल्याकडे बार्बी, मिकी माऊस, स्पायडर मॅन आदींच्या टाक्या असलेल्या मोठ्या आकाराच्या पिचकारी असल्याचे सांगितले. त्यामुळे १०० ते ६०० आणि ७०० रुपयांपर्यंत पिचकारी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. (Holi Festival 2024)
रासायिक रंगांच्या विक्रीची मागणी घटल्यामुळे यंदा बाजारात साधे रंग आणि हार्बर रंगच अधिक विक्रीला आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार रासायनिक रंगांची मागणी घटल्याने साधे रंगच विक्रीला आणले आहे. त्यामुळे या साध्या रंगांनाच अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु पहिल्याप्रमाणे रंगाची विक्री मोठ्याप्रमाणात होत नसून जेवढे रंग खरेदी केली त्याची मुद्दल तरी निघाली म्हणजे झाले अशी भीतीही त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. (Holi Festival 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community