मध्य रेल्वेकडून होळीसाठी विशेष गाड्या!

87

मुंबईकर महत्वाच्या सणांसाठी आवर्जून गावची वाट धरतात. सण, सुट्ट्या असल्या की, रेल्वे गाड्या, खासगी बसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता होळी, रंगपंचमी जवळ येत आहे त्यामुळे या महत्वाच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मुंबई ते बलिया दरम्यान २२ त्रि-साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्यांना दिलासा! )

होळीसाठी विशेष ट्रेन

  • ट्रेन क्र.01001 त्रि-साप्ताहिक विशेष गाडी, दिनांक ७ मार्च ते ३० मार्च पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २.१५ वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी ०१.४५ वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्र.01002 त्रि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ९ मार्च ते १ एप्रिल पर्यंत, बलिया येथून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ३.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

या स्थानंकावर विशेष गाड्या थांबतील

कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड, वाराणसी, औरीहर, मउ आणि रसरा

  • रेल्वेची रचना: एक द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान (Sleeper) आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे.

३ मार्चपासून या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू तुम्ही तिकिट बुक करू शकता. तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या लिंकला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.