Holi Trade: : रंगांची उधळण करणाऱ्या होळीचा सण (Holi Festival) संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. या आधी होळीमध्ये चीनच्या रंगांचा आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. पण हे चित्र यंदा बदलल्याचं दिसलंय. CAT या व्यापारी संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, होळीच्या निमित्ताने यंदा ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. गेल्या वर्षी होळीत ५० हजार कोटींची उलाढाल झाली होती. (Holi Trade:)
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (CAT) राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल (Praveen Khandelwal) यांनी सांगितले की, यंदा होळीत चिनी वस्तूंवर ग्राहकांनी बहिष्कार घातल्याचे दिसून येत आहे. लोक केवळ भारतात बनलेले हर्बल रंग (Holi herbal color) आणि गुलाल तसेच पिचकाऱ्या, फुगे, चंदन, पूजा साहित्य, वस्त्र प्रावरणे व इतर साहित्य खरेदी करत आहेत.
(हेही वाचा – Thane Municipal Corporation देणार विनामूल्य शाडू माती; मूर्ती घडविण्यासाठी जागा)
व्यवसायात २० टक्के वाढ
१) यंदाच्या होळीत गेल्यावर्षीच्या • तुलनेत २० टक्के अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे.
२) गेल्या वर्षी ५० हजार कोटींचा व्यवसाय झाला. यंदा राजधानी दिल्लीतच ८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Haribhau Bagade: ‘बलात्काऱ्यांना नपुंसक करा, छत्रपती शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते’; काय म्हणाले राजस्थानचे राज्यपाल?)
ऑनलाईन कंपन्यांचा विक्रीचा विक्रम
झोमॅटोच्या ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इंस्टामार्ट सारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मने होळीच्या दरम्यान विक्रीचे नवीन विक्रम प्रस्थापित केले. होळीवर लोक ज्या वस्तूंची ऑर्डर देत होते त्यात गुलाल, पिचकारी, मिठाई तसेच फुलांचा समावेश होता. यासोबतच लोकांनी ऑनलाइन (Trade online) माध्यमातून खोबरेल तेल आणि पांढऱ्या टी-शर्टचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
हेही पाहा –