Palghar सह Thane जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी; उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली

168
Palghar सह Thane जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी; उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली
Palghar सह Thane जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी; उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली

पालघरसह (Palghar) ठाणे (Thane) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २५ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुटी दिली आहे. २४ जुलैपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला, तर कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलाला देखील पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी पुलावरून वाहण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Landslide in Lavasa : लवासामध्ये भूस्खलन; २ व्हिलांवर कोसळली दरड)

उल्हास नदीने 17.60 पातळी गाठली. त्यामुळे प्रशासनाने बदलापूरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी गरज असेल, तरच घराच्या बाहेर पडा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. नदीने 20 मीटर पाणीपातळी गाठल्यास शहरात पुराचे पाणी येऊ शकतो.

मुंबई उपनगरातही पाणीच पाणी

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. काही काळापूर्वी पावसाने उसंत घेतली होती यानंतर आता पुन्हा मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून मुंबईला आलो देखील देण्यात आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उपनगरातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली गेले आहेत. दहिसर पूर्वेकडील एस वी रोड आणि शिवाजी रोड परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे.

पालघरच्या सर्व शाळा, कॉलेज आज रद्द

पालघर (Palghar) जिल्ह्यातील दुपारच्या सञातील सर्व शाळांना पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेञातील सर्व शाळा, कॉलेजचा समावेश आहे. सध्या भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात सध्यस्थितीमध्ये अतिवृ्‌ष्टी होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिका-यांनी हा आदेश काढला आहे. सकाळी भरलेल्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना सुट्टी देवून, तात्काळ घरी सोडण्यात याव्यात, तर दुपार सञात भरणा-या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.