Home Guard भरती सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज?

253

महाराष्ट्रात होमगार्ड (Home Guard) भरती सुरू करण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या सहकार्याने नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात 253 पुरुष आणि 60 महिला होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत आहे.

होमगार्ड सदस्यत्त्वाचे फायदे

  • सैनिकी गणवेश परीधान करण्याचा मान आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण.
  • 3 वर्षे सेवापूर्ण होमगार्डना (Home Guard) राज्य पोलीस दल, वनविभाग आणि अग्निशमन दलात 5 टक्के आरक्षण
  • प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
  • गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार / पदके मिळवण्याची संधी.
  • स्वत:चा व्यवसाय / शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

(हेही वाचा Om Certificate : शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रध्द्धेचे युद्ध श्रध्द्धेने लढू या – रणजीत सावरकर)

होमगार्ड नोंदणी आणि अटी

होमगार्ड (Home Guard) पात्रतेचे निकष – शैक्षणिक पात्रताकमीत कमी 10वी उत्तीर्ण, शारीरिक पात्रता वय – 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत (16 ऑगस्ट 2024 रोजी), उंची – पुरुषांसाठी – 162 सें.मी. आणि महिलांसाठी 150 सें.मी. छाती – फक्त पुरुष उमेदवारांकरीता (न फुगवता किमान 76 सें.मी. कमीतकमी 5 सें.मी. फुगविणे आवश्यक).

आवश्यक कागदपत्रे 

  • रहिवासा पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य), शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जन्मदिनांक पुराव्यासाठी एसएससी बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास तत्सम प्रमाणपत्रखाजगी नोकरीकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
    3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  • होमगार्ड (Home Guard) सदस्य नोंदणीसाठी अर्ज कसा करावा आणि याच्या संदर्भातील सरविस्तर जाहिरात पाहण्यासाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या लिंकवर क्लिक करा.

नोंदणी अर्ज भरण्याच्या सूचना

होमगार्ड (Home Guard) नोंदणीचे अर्ज रायगड जिल्ह्यासाठी 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या वेबसाईटवर भरता येतील. अर्ज भरण्यापूर्वी दिलेले माहिती पत्रक काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाची आहे. उमेदवार रायगड जिल्ह्यातील ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अतंर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत आणि पथकामध्ये अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.