पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार ‘ड्रग-मुक्त भारत’ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, पैशाच्या हव्यासापोटी युवकांना व्यसनाच्या अंधाराच्या खाईत ढकलणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांना शिक्षा करण्याबाबत मोदी सरकार कठोर असल्याचे केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटले.
अंमली पदार्थ मुक्त भारताच्या निर्मितीसाठी सरकार निष्पक्ष आणि दक्ष तपासणीसह अंमली पदार्थांच्या संकटाचा सामना करत राहण्यासाठी कटिबद्ध आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) यासाठी सर्व स्तरांवर रणनीती अवलंबत २९ अंमली पदार्थ तस्करांना देशभरातील १२ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले आहे आणि त्यांना शिक्षा सुनावली आहे. ही १२ प्रकरणे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या अहमदाबाद विभाग, भोपाळ (मंदसौर), चंदीगड, कोचीन, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोलकाता आणि लखनौ विभागातील असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत नशा मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एनसीबी अथक परिश्रम करत आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत एनसीबीला लोकांचे समर्थन हवे आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. एनसीबीने २०१९ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती रेल्वे स्थानकावर २३.८५९ किलो चरससह तीन जणांना अटक करण्यात आली आणि त्यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जुलै २०२२ मध्ये, एनसीबीने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शहडोलमध्ये १२३.०८० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आणि त्यांना १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी २ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community