होम क्वारंटाईनबाबत घेतलेला निर्णय सरकाराला बदलावा लागणार? 

आधीच राज्यांमध्ये सध्या २ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात जर २० लाख होम क्वारंटाईन असलेल्यांची व्यवस्था करायची म्हटल्यास सरकारला सध्या तरी हे शक्य होणारे नाही, अशी परिस्थिती आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कसा बसा रुग्ण संख्येवर आळा आणल्यावर ‘होम क्वारंटाईन पद्धत बंद करत आहोत, सर्वांना आता सक्तीने संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहावे लागले’, असा तडकाफडकी निर्णय घेतला. त्यानंतर होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली. जेव्हा सरकारला होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या समजली तेव्हा मात्र सरकारची झोप उडाली, कारण तब्बल २० लाख रुग्ण सध्या होम क्वारंटाइन आहेत. त्यामुळे कदाचित सरकारने या निर्णयापासून घुमजाव केला असण्याची शक्यता आहे.

१० जिल्ह्यांत २० लाख रुग्ण! 

सध्याचा घडीला राज्यातील १० प्रमुख राज्यांमध्ये अंदाजे २० लाख रुग्ण हे होम क्वारंटाइन आहेत. १५ हजार हे संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. तर अवघे २६ टक्के खाटा रुग्णालयांतील भरलेल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्य विभागाने जमवली आहे.

(हेही वाचा : दहावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्येच संभ्रम! निकाल अंदाजे लावणार?  )

प्रत्येक जिल्ह्यात २ लाख खाटा निर्माण कराव्या लागतील!

आधीच राज्यांमध्ये सध्या २ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यात जर २० लाख होम क्वारंटाईन असलेल्यांची व्यवस्था करायची म्हटल्यास सरकारला सध्या तरी हे शक्य होणारे नाही, अशी परिस्थिती आहे. कारण सरकारला जर या निर्णयावर अंमलबजावणी करायची झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात २५ हजार ते २ लाखापर्यंत खाटा निर्माण कराव्या लागतील, त्यासाठी तेवढी सुविधा निर्माण करावी लागेल, असेच मनुष्यबळ उभे करावे लागेल, जे सध्या तरी शक्य नसल्याने सरकारने या निर्णयापासून तूर्तास किनारा घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here