-
ऋजुता लुकतुके
देशातील सात महत्त्वाच्या शहरांमध्ये घर खरेदीच्या व्यवहारांमध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. खरंतर या कालावधीत गणेशोत्सव होता. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात या कालावधीत एरवी घर खरेदीचा उत्साह वाढलेला असतो. पण, यंदा तो आधीच्या तुलनेत थंडावलेला दिसला. गेल्यावर्षी याच कालावधीत १.१२ लाख घरांची विक्री झाली होती. तोच आकडा यंदा १.०७ लाखांवर आला आहे. (Home Sales Down)
शहरांतील घरांच्या वाढलेल्या किमती आणि अनियमित पाऊस यामुळे घर खरेदीवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय. येणारा कालावधी हा दसरा आणि दिवाळीच्या सणांचा असल्याने ही परिस्थिती बदलेल अशी आशा बांधकाम उद्योजकांना आहे. सध्या घरांच्या वाढलेल्या किमती पाहता, लोकांची भूमिका थांबा आणि विचारपूर्वक गुंतवणीक करा अशीच दिसत आहे. ॲनारॉक या रिअल इस्टेट कन्सल्टिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीने एक अहवाल सादर केला आहे. या कंपनीने मुंबई, दिल्ली, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या सा शहरांमध्ये घर खरेदीची आकडेवारी तपासली आहे. (Home Sales Down)
ॲनारॉकच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १.२० लाख घरांची विक्री झाली होती. तो आकडा आता १.०७ लाखांवर आला आहे. मागच्या दोन वर्षांत या सात शहरांमध्ये घरांच्या किमतीत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच घरांची मागणी कमी झाल्याचा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. त्याचबरोबर पावसाची अनियमितता हे आणखी एक कारण बांधकाम व्यावसायिकांनी पुढे केलं आहे. मुंबईसारख्या शहरांत गेल्या ३ महिन्यांत ३६,१९० घरांची विक्री झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही विक्री १३ टक्क्यांनी कमी आहे. (Home Sales Down)
(हेही वाचा- Jammu-Kashmir च्या Kulgam मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा)
पण, येत्या दसरा, दिवाळीच्या हंगामात यात वाढ होईल अशी आशाही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. (Home Sales Down)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community