अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणास सुरुवात

160

अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण करण्यास अंधेरीपासून एका विभागात प्रायोगिक तत्वावर सुरुवात केल्यानंतर, गुरुवारी ५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व विभगांमध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेने अशाप्रकारच्या रुग्णांची नोंदणी करण्याचे आवाहन जनतेला केल्यानंतर आतापर्यंत अंथरुणाला खिळलेल्या ४ हजार ४६६ रुग्णांची नोंदणी महापालिकेकडे लसीकरणासाठी झालेली आहे.

अंधेरीतून सुरुवात

मुंबईतील २४ विभागांमधून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांचे घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात टीम तयार केली आहे. डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ रुग्णवाहिका व सपोर्टर स्टाफ ही मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंथरुणात खिळून असलेल्या व्यक्ती कुठेही येऊ -जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या व्यक्तींचे लसीकरण करणे गरजेचे आहे. प्रायोगिक तत्त्वावर याआधी अंधेरी पूर्व व पश्चिम विभागातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. या वॉर्डात ६०० हून अधिक अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, अंथरुणाला खिळून असलेल्या ४ हजार ४६६ व्यक्तींची नोंद झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

अटींचे पालन गरजेचे

या लसीकरणासाठी किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रं देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल.

या मेलवर व्यक्तींची माहिती द्या

वयोवृद्ध, तसेच विविध आजारांनी ग्रस्त ज्या व्यक्ती अंथरुणावरच असतात. ज्यांना दुसऱ्यावर अवलंबून रहाणे भाग आहे, अशा व्यक्तींचे लसीकरण घरात जाऊन करण्यात येत आहे. अशा व्यक्ती घरात असतील तर त्या व्यक्तीची माहिती पालिकेच्या या ई-मेल आयडीवर [email protected] पाठवावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.