- ऋजुता लुकतुके
होंडाची जुनी सीबी ५०० एक्स (Honda CB500X) सीरिज ही ॲडव्हेंचर बाईक सीरिज आहे. आता या बाईकमध्ये थोडे बदल करून आणि आधुनिकता आणून कंपनीने नवीन एनएक्स ५०० (NX 500) ही बाईक भारतात लाँच केली आहे. प्री बुकिंग केलेल्या लोकांना या बाईकचा ताबा देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सीबी ५०० एक्स (CB500X) बाईक आणि एनएक्स ५०० यांचं इंजिन तेच आहे. फक्त काही फिचर आणि स्टायलिंग थोडं बदललं आहे. (Honda CB500X)
नवीन गाडीचं वजन थोडंफार कमी करण्यात आलं आहे. ग्रँडप्रिक्स रेड, पर्ल होरायझन व्हाईट आणि गनपावडर ब्लॅक असा तीन तरुणाईला आकर्षित करणाऱ्या रंगांत ही बाईक उपलब्ध आहे. आणि या बाईकची किंमत आहे ५.९ लाख रुपये. गाडीचं इंजिन जुनंच आहे. आणि त्याची शक्ती ४७१ सीसी क्षमतेही आहे. ट्विन पॉवर इंजिन असलेल्या या गाडीत ६ स्पीड गिअरचा बॉक्स आहे. नवीन बाईकचं वैशिष्ट्य आहे ५ इंचांचा डिजिटल डिस्प्ले. (Honda CB500X)
2023 Honda CB500X First Look Preview. https://t.co/vfW2C1wE72
— Cars Motors Bikes (@carsmotorsbikes) February 18, 2023
(हेही वाचा – Hotels in Nainital Mall road : नैनितालमध्ये पर्यटनासाठी जाणार असाल तर ‘या’ हॉटेलचा विचार नक्की करा)
या बाईकला मिळाले चांगले प्री-बुकिंग
डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीने गाडीचं प्री-बुकिंग (Pre booking) सुरू केलं होतं. आणि आता डिलिव्हरीला सुरुवात झाली आहे. एनएक्स ५०० मॉडेलमध्ये वजन आधीच्या तुलनेत ३ किलोंनी कमी करण्यात आलं आहे. नवीन बाईकचं वजन १९६ किलो आहे. आणि सीटची उंचीही ८३० मिमी इतकी कमी करण्यात आली आहे. (Honda CB500X)
होंडा सीबी ५०० एक्स (Honda CB500X) गाडीची किंमत एनएक्स ५०० (NX 500) पेक्षा जास्त होती. त्यामुळे भारतात ५०० सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या बाईकमध्ये ही बाईक फारशी चालली नाही. पण, आता एनएक्स ५०० (NX 500) बाईकला चांगलं प्री-बुकिंग मिळालं आहे. आणि मध्यम आकार आणि मध्यम ताकदीच्या बाईकना भारतात हल्ली चांगली मागणी आहे. (Honda CB500X)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community