Honey Bee Attack : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; 50 ते 60 पर्यटक जखमी

52
Honey Bee Attack : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; 50 ते 60 पर्यटक जखमी

पुण्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. मात्र, सकाळच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई मंदिर परिसरात आग्या मोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 50 ते 60 जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर दुर्गप्रेमींची धावपळ पहायला मिळत आहे. यावेळी अनेक लहान मुले देखील किल्ल्यावर असल्याची माहिती मिळत आहे. (Honey Bee Attack)

(हेही वाचा – Amritsar Temple Grenade Attack ची CBI चौकशी करावी ; भाजपाच्या ‘या’ नेत्याची मागणी !)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार (दि. १६) किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला असून त्यात ५० ते ६० पर्यटक जखमी झाले आहेत. शिवाई मंदिर हे पूर्णपणे मधमाशांनी भरले असून मंदिरात दुर्गप्रेमी अडकले आहेत. तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ला झाल्यानंतर एकच धावपळ सुरू झाली आणि किल्ल्यावरून खाली येण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले. (Honey Bee Attack)

(हेही वाचा – Sunita Williams यांना घेण्यासाठी मस्क यांचे स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनवर पोहोचले !)

या घटनेची माहित मिळताच आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी तातडीने पर्यटकांना गडावरून खाली येण्यास सांगितलं. वनविभागाकडून आग्या मोहळ शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग्या मोहळाचा हा हल्ला असून दगड मारल्यानेच आग्या मोहळ उठले असल्याचे काही पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक पर्यटक या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना ॲम्बुलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (Honey Bee Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.