- ऋजुता लुकतुके
ऑनर एक्स९बी ५जी हा फोन भारतात अधिकृतपणे १५ फेब्रुवारीला लाँच होणार हे आता स्पष्ट झालं आहे. पण, कंपनीने फोनची स्पेसिफिकेशन आणि इतर महिती काही दिवसांपूर्वीच आपल्या ट्विटर खात्यावर प्रसिद्ध केली होती. चिनी कंपनीचा हा फोन भगव्या आणि काळ्या रंगात भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. आणि त्यात स्नॅपड्रॅगन सहाव्या पिढीचा प्रोसेसर असेल हे टिझरवरुन दिसत आहे. तर फोनमधील बॅटरी ५,८०० एमएच क्षमतेची असेल. (HONOR X9B 5G)
फोनमधील बॅटरीवर तुम्ही १८ तास फोनवर बोलू शकता. १२ तास व्हिडिओ गेम खेळू शकता किंवा १९ तास व्हिडिओ पाहू शकता. आणि एकदा फोन चार्ज केल्यावर फारशा सेवा वापरल्या नाहीत तर तीन दिवसांपर्यंत तुम्हाला पुन्हा चार्जिंग करावं लागणार नाही. हा फोन १००० वेळा चार्ज केल्यानंतरही बॅटरीची क्षमता ८० टक्क्यांपर्यंत टिकून राहते, असाही कंपनीचा दावा आहे. (HONOR X9B 5G)
कंपनीच्या इतर फोन प्रमाणेच हा ही अँड्रॉईडवर आधारित फोन असून ८ जीबीची रॅम असेल. आणि २५६ जीबीचं इनबिल्ट स्टोरेज असणार आहे. (HONOR X9B 5G)
Honor X9b 5G key specs, colour options teased ahead of next week’s launch. See here https://t.co/SmDx9GprG7
— Gadgets 360 (@Gadgets360) February 7, 2024
भारतात या फोनची किंमत इतक्या रुपयांपासून सुरू होईल
फोनचं वैशिष्ट्य म्हणजे, सध्याची ८ जीबी रॅम व्हर्च्युअल रॅम या प्रणालीचा उपयोग करून गरज असल्यास २० जीबी रॅम पर्यंत वाढवता येते. भारतात मध्यरात्रीचा काळा रंग आणि पहाटेचा भगवा रंग असा दोन रंगांत तो उपलब्ध आहे. तर फोनमधील कॅमेराचं डिझायनिंग डुआल रिंग पद्धतीचं आहे. (HONOR X9B 5G)
ऑनर एक्स९बी फोन बरोबरच कंपनीची चॉईस इअरबड्स एक्स५ आणि ऑनर चॉईस वॉच ही दोन उत्पादनंही भारतात एकाच वेळी लाँच होत आहेत. ऑनर कंपनीने जागतिक बाजारात हा फोन गेल्यावर्षी मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीत लाँच केला होता. आणि तिथे त्याला प्रतिसादही मिळाला. फोनमध्ये ६.७ इंचांचा डिस्प्ले आहे. आणि कॅमेराची क्षमता १०८ मेगापिक्सेलची आहे. स्मार्ट चार्जिंगची सोय या फोनमध्येही आहे. भारतात या फोनची किंमत २८,९९९ रुपयांपासून सुरू होईल अशी शक्यता आहे. (HONOR X9B 5G)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community