गौरवास्पद! राज्यातील १६९ खेळाडूंचा Shiv Chhatrapati State Sports Award ने सन्मान

492
गौरवास्पद! राज्यातील १६९ खेळाडूंचा Shiv Chhatrapati State Sports Award ने सन्मान
गौरवास्पद! राज्यातील १६९ खेळाडूंचा Shiv Chhatrapati State Sports Award ने सन्मान
Shiv Chhatrapati State Sports Award : महाराष्ट्र राज्याने खेळाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. तसेच राज्याचा गौरवशाली इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. राज्यातील १६९ खेळाडूंना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर एयर रायफल क्लबचे (Swatantryaveer Savarkar Air Rifle Club) सदस्य रुचिता विनेरकर (Ruchita Vinerkar) आणि रुद्रांक्ष पाटील (Rudranksh Patil) यांचाही समावेश होता. नेमबाजी क्रीडा प्रकारात त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Shiv Chhatrapati State Sports Award)

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२- २३ व २०२३-२४ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, प्रशांत बंब, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.


(हेही वाचा – Congress कार्यकर्त्यांचा पुण्यात धुडगुस; लोकल रोखल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप)

तसेच २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कारसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. या पुरस्कारांसह यावेळी दोन्ही वर्षाचे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार १६९ खेळाडू व प्रशिक्षक यांना प्रदान करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांनी खेळाडुंना मार्गदर्शन केले. यावेळी ते  म्हणाले की, आज खेळ हे तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल. शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळांमध्ये अनेक मुली पुढे येत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवतात याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे.भविष्यात सर्व क्रीडा प्रकारात आपण वर्चस्व गाजवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Mumbai-Thane महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी युती होणार!)

तसेच मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये खुल्या जागांची मोठी कमतरता आहे तिथे शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक मैदाने आणि क्रीडा क्लब यांच्यासोबत सहयोग करू शकतात, असेही राज्यपाल म्हणाले.  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असून महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करण्यास पुढाकार घ्यावा, ‘विकसित भारत’ बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिंपिकमध्येही सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजे. आपले खेळाडू त्यात यशस्वी होतील असा आशावादही राज्यपालांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.