बांबू क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल Pasha Patel यांचा सन्मान

39
बांबू क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल Pasha Patel यांचा सन्मान
  • प्रतिनिधी 

फाऊंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्स (FMC), नवी दिल्ली यांनी सार्क डेव्हलपमेंट फंड (SDF) यांच्या सहकार्याने ‘नेट झिरो साध्य करण्यासाठी न्याय्य संक्रमण-o सार्क क्षेत्रामध्ये बांबूची भूमिका’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिल्ली येथे केले होते. या परिषदेत सार्क क्षेत्रातील महत्त्वाचे हितधारक एकत्र आले आणि बांबूच्या सहाय्याने शाश्वत विकास व नेट झिरो भविष्यात कसे योगदान देता येईल यावर सखोल चर्चा केली. (Pasha Patel)

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : ‘… तर रोहित शर्मा स्वत:च निवृत्त होईल’ – सुनील गावस्कर)

या परिषदेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, तसेच मुख्यमंत्री कार्यदलाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांना भारतातील बांबू क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्सचे अध्यक्ष अजय शंकर यांच्या हस्ते पाशा पटेल (Pasha Patel) यांचा सत्कार करण्यात आला. ही परिषद “सार्क देशांमध्ये एकात्मिक बांबू-आधारित उद्योजकता विकासाला चालना देणे” या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरली.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण)

हा प्रकल्प २०१७ पासून अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ येथे राबवला जात आहे. सार्क डेव्हलपमेंट फंडच्या सहकार्याने हा प्रकल्प शाश्वत आर्थिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण यासाठी बांबूचा उपयोग करण्यावर भर देण्यात येत आहे. या परिषदेमुळे सार्क देशांनी सामाजिक व आर्थिक विकासासाठी बांबू क्षेत्राचा विकास करण्याची सामूहिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली. हवामान बदलावर मात करण्यासाठी, ग्रामीण उपजीविकेस चालना देण्यासाठी आणि शाश्वत व हिरव्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी बांबूच्या प्रचंड संभाव्यतेवर भर देण्यात आला. (Pasha Patel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.