देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार वर्षभर राबवण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने झाला आहे. या अंतर्गत जी उत्तर विभागांतर्गत दादर उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार आणि ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या विशेष उपस्थितीत ‘वीरांना-वंदन’ हा उपक्रम पार पडला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्यासह अनेकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भारत सरकार आणि देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून या अभियानांतर्गत मुंबईमध्ये शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे आणि मिट्टी यात्रा आदी उपक्रम राबविण्यात आले. मुंबईकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रभिमान, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम व्यक्त केले.
(हेही वाचा – Parliament Monsoon Session : मणिपूर प्रकरणी जनतेला भ्रमित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडला)
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्या मार्गदर्शनात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानात शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे आणि मिट्टी यात्रा आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जी -उत्तर’ विभागांतर्गत दादर येथे उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार व ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या विशेष उपस्थितीत ‘वीरांना-वंदन’ हा उपक्रम पार पडला. यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, हुतात्मा लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांचे बंधू रंजन गुप्ते, हुतात्मा लेफ्टनंट प्रकाश कोटनीस यांच्या भगिनी मीरा पंडित आदी कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजी सुर्वे, सैन्य दलाचे निवृत्त अधिकारी अहमद शेख, वायूसेनेचे निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट सुहास गोडसे, निवृत्त कॅप्टन प्रफुल्ल तावडे, स्वातंत्र्य सेनानी बाबू म्हसकर यांचे पुत्र तथा निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत म्हसकर, पद्मश्री तथा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या कन्या विशाखा दळवी, पद्मश्री पुरस्कारप्राप्त पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नाट्यनिर्माते स्व. मोहन वाघ यांच्या पत्नी पद्मजा वाघ, अर्जून पुरस्कारप्राप्त मल्लखांबपटू हिमानी परब, श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ क्रीडापटू आणि समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे, स्वातंत्र्यसेनानी ॲड. विठ्ठल हरिश्चंद्र देसाई यांचे नातू ॲड गिरीष राऊत आदींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community