- विशेष प्रतिनिधी,मुंबई
घाटकोपर येथील होर्डींग (Hording) दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील ४० बाय ४० फुटापेक्षा मोठ्या आकाराचे फलक काढून टाकण्यासंदर्भात महापालिकेच्यावतीने(Municipal Corporation) रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवण्यात आल्यानंतर आतापर्यंत रेल्वे हद्दीतील १४ जाहिरात फलक काढून टाकण्यात आले आहे. रेल्वे प्रशासन आणि जीआरपी यांच्या अंतर्गत येणाऱ्या १४ मोठ्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली असली तरी रेल्वेच्या हद्दीतील २९ मोठे फलक आजही जैसे थेच आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीतील फलकांचे करायचे काय असा प्रश्न महापालिकेपुढे उपस्थित होऊ लागला आहे. (Hording)
(हेही वाचा- Fraud : निवृत्तीवेतनधारकांनो ‘या’ फसवणुकीपासून व्हा सावध; लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन)
घाटकोपर येथील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय जाहिरात फलकाच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने (Municipal Corporation) आपत्कालिन कायद्यांतर्गत रेल्वेसह इतर प्राधिकरणांच्या हद्दीतील ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या आकाराचे फलक जमिनदोस्त करणे तसेच ४० बाय ४० फुटाच्या आकारा एवढ्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना महापालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले आहे. (Hording)
मात्र, रेल्वेला नोटीस पाठवूनही अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही रेल्वे प्रशासनाकडून झालेली पहायला मिळत नाही. रेल्वे प्रशासनाने, आपल्याकडे यंत्रणा नसल्याने महापालिकेला काही फलक त्वरीत काढण्याची विनंती केली. त्यानुसार रेल्वे आणि जीआरपीच्या हद्दीतील १४ फलक काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये घाटकोपरमधील ६ आणि दादरमधील ८ फलकांचा समावेश आहे. तर दोन फलक आधीच पडले होते. मात्र, उर्वरीत फलक अद्यापही रेल्वे प्रशासनाने पाडले नसल्याने महापालिकेने पुन्हा एकदा रेल्वेला पत्र पाठवले आहे. (Hording)
रेल्वेकडे याबाबतची यंत्रणा त्यांनी महापालिकेला (Municipal Corporation) मोठे फलक काढायला सांगितले असले तरी त्यासाठी आलेला खर्चाची रक्कम देण्या बाबत कोणताही निर्णय कळवलेला नाही. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील मोठ्या आकाराच्या एकूण ४५ जाहिरात फलक होते, त्यातील १४ फलक काढून टाकल्याने तसेच २ आधीच पाडून टाकल्याने उर्वरित २९ फलक अद्यापही जैसे थे च आहेत. शिवाय जे अन्य फलक आहेत, त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट बाबत कोणताही अहवाल देण्यात आलेला नाही. त्यामुळे रेल्वे हद्दीतील या जाहिरात फलकचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महापालिका प्रशासन पडताळून पाहत आहे. दरम्यान ,रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक यांनी महापालिकेला पत्र पाठवून आपण काय उपाय योजना करत आहोत, याची माहिती पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. (Hording)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community