रत्नागिरीमध्ये Hospital on Wheels सुरू करणार – उदय सामंत

58
रत्नागिरी मध्ये Hospital on Wheels सुरू करणार - उदय सामंत
रत्नागिरी मध्ये Hospital on Wheels सुरू करणार - उदय सामंत

घराघरात आरोग्याची सुविधा पोहचविण्यासाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ (Hospital on Wheels) ही संकल्पना रत्नागिरीत सुरू होणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज दिले.

येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभीम) क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आरोग्याच्या सुविधा निर्माण करताना चांगल्या इमारती हव्यात. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सीसीयूमुळे मदत होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॅशलेस हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) सुरू आहे. लवकरच हॉस्पिटल ऑन व्हील (Hospital on Wheels) ही संकल्पना जिल्ह्यात आणणार असून, त्या माध्यमातून घराघरात आरोग्याच्या सुविधा पोहचविल्या जातील. डॉक्टरांनी रुग्णांवर हसत हसत उपचार केले पाहिजेत.

(हेही वाचा – GBS सिंड्रोमवर शासनातर्फे मोफत उपचार मिळणार; Ajit Pawar यांची घोषणा)

काही महिन्यांपूर्वी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रशियन महिलेच्या मानसिकतेवर उपचार करण्यात आले. घरच्यांपेक्षाही चांगले उपचार तेथे आल्यावर रुग्णांवर होतात. या महिलेवरही तसे उपचार झाल्यानंतर तिला तिच्या कुटुंबाकडे पाठविण्यात आले. एका अर्थाने हे प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे काम झाले आहे. त्याबद्दल डॉ. फुले यांना धन्यवाद देतो, असे सांगून पालकमंत्री सामंत (Uday Samant) यांनी हे प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातच राहणार आहे. ते कोणत्याही जिल्ह्यात हलणार नाही, अशी ग्वाही दिली. शासकीय कार्यालयांबरोबरच शासकीय रुग्णालये, त्याचा परिसर, विशेषत: शौचालये, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती जबाबदारी प्रत्येकांनी पार पाडावी, असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.