जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनने थैमान घातले आहे. भारतातही या जीवघेण्या विषाणूचा शिरकाव झाल्याने भारतीय आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सरकारने सुमारे 2000 मेट्रिक टन क्षमतेचे 1 हजार 563 प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (PSA)ऑक्सिजन निर्मिती संयंत्र मंजूर केले असून ते देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये पीएम केअर्स निधी अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापित आणि कार्यान्वित 1 हजार 225 पीएसए प्लांट्सचा समावेश आहे.
येथेही उभारले जाणार प्लांट्स
याव्यतिरिक्त, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे 281 पीएसए प्लांट्स उभारले जात आहेत आणि 57 पीएसए प्लांट्स परदेशी अनुदान अंतर्गत प्राप्त झाले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांना प्लांट्स बसवणे अनिवार्य
राज्यांना सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये पीएसए प्लांट्स बसवण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वार्षिक एमबीबीएस प्रवेश नियमन , 2020 साठी किमान आवश्यकतांमध्ये सुधारणा करून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पीएसए प्लांट्स बसवणे अनिवार्य केले आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
( हेही वाचा: चिनी हॅकर्सवर होणार आता प्रतिहल्ला! कसा तो वाचा )
Join Our WhatsApp Community