Hotel : हाॅटेल व्यावसायिक श्री अराहा हाॅस्पिटॅलिटी प्रा.लि. कडून कोट्यवधी रुपयांची कर चुकवेगिरी

509
सचिवालय जिमखाना, मंत्रालय, येथील हॉटेल (Hotel) व्यावसायिक श्री अराहा हाॅस्पिटॅलिटी प्रा. लि./मे. मिरची तडका कर चुकवेगिरी करत असल्याबाबतची रीतसर तक्रार सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक वसंत उटीकर यांनी २२ जून २०२३ रोजी राज्यकर आयुक्त, जीएसटी भवन, मुंबई या कार्यालयात केलेली होती.
या व्यापा-याची  तक्रार केलेल्याच्या अनुषंगाने उटीकर यांनी जीएसटी विभागाने सदर प्रकरणात काय कार्यवाही केली? याबाबत  माहितीच्या अधिकारात २२ एप्रिल २०२४ रोजी अर्ज करून माहितीचे कागदपत्रे मागितलेली होती.  उटीकर यांना समाधानकारक  माहिती प्राप्त न झाल्याने त्यांनी १७ मे २०२४ रोजी प्रथम अपिल दाखल केले.  या प्रकरणात  ७ जून २०२४ रोजी सुनावणी पार पडली. २५ जून २०२४ रोजीच्या अपिल आदेशान्वये  माहिती देण्याचे निर्देश अपिल अधिकारी, राज्यकर उपायुक्त सुनिल म. चव्हाण यांनी संबंधित माहिती अधिका-याला  दिलेले होते.
त्या अनुषंगाने माहिती अधिकारी तथा स्वीय सहाय्यक, राज्य कर सहआयुक्त ए. बी. चव्हाण यांनी १० जुलै २०२४ च्या पत्रान्वये माहिती  उटीकर यांना पुरविण्यात आली.  माहितीच्या अधिकारात या हाॅटेल व्यापा-याच्या अन्वेषण भेटीअंती तब्बल रुपये ४ कोटी ४८ लाख २७ हजार ६५१ इतकी कर निश्चिती करण्यात आली असून रुपये १७ लाख ६७ हजार ५६३ रुपये इतका कर भरणा करण्यात आला असून उर्वरीत कार्यवाही सुरू आहे, अशी धक्कादायक व खळबळजनक माहिती उटीकर यांना प्राप्त झाली आहे.  उटीकर यांनी सदर हाॅटेल व्यावसायिकाच्या केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे अतिशय स्पष्टपणे आढळून आलेले आहे. उटीकर यांनी हे प्रकरण लावून धरल्याने  महाराष्ट्र शासनाचा बुडणारा जीएसटी कर वाचविण्यास नक्कीच कणभर हातभार लागला आहे, हे निश्चित आहे. (Hotel)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.